कतरिना कैफने शेअर केला 'आई'सोबतचा टॉवेलमधला फोटो

Katrina Kaif Social Media Post : कतरिना कैफनं टॉवेलमधील एक फोटो शेअर करत त्याला, ‘मी आणि आई बराच काळानंतर’ असं कॅप्शन दिलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 03:15 PM IST

कतरिना कैफने शेअर केला 'आई'सोबतचा टॉवेलमधला फोटो

मुंबई, 27 जून : सलमान खानच्या भारत सिनेमानंतर अभिनेत्री कतरिना कैफनं आता तिचा आगामी सिनेमा ‘सूर्यवंशी’च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. पण काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारसोबत टॉवेलमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं कतरिना चर्चेत आली आहे. पण कतरिनानं पुन्हा एकदा असाच फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. पण यावेळी तिच्यासोबत अक्षय नाही तर दुसरीच एक व्यक्ती या फोटोमध्ये दिसत आहे.

...तर मलायका अरोरा आणि अरबाज खान पुन्हा येणार एकत्र?

कतरिना कैफ सध्या तिचा आगामी सिनेमा सूर्यवंशीच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो कतरिना नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउटवर शेअर केला आहे. या सिनेमामध्ये अक्षयकुमार आणि रवीना टंडनच्या ‘मोहरा’ सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे आणि बॉलिवूडची प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर फराह खान या गाण्याची कोरिओग्राफी करत आहे. त्यामुळे कतरिना याच्या सीक्वेंससाठी पाण्यात भिजत आहे आणि त्यानंतर तिला टॉवेलची मदत घ्यावी लागत आहे. अशात तिनं फराह सोबत टॉवेलमधील एक फोटो शेअर केला. या फोटोला तिनं, ‘मी आणि आई बराच काळानंतर’ असं कॅप्शन दिलं आहे.

रणवीर सिंहला मागे टाकत विकी कौशल बनला सॅम मानेकशॉ, पाहा फर्स्ट लुक

Loading...

 

View this post on Instagram

 

Me and mummmmyyyyy together after soooooooo long 🌟love u the bestest best ❤️ #sooryavanshi #towelseries

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

फराह खानच्या अगोदर कतरिनानं असाच एक अक्षय कुमारसोबतचा फोटोही शेअर केला होता. फराह आणि कतरिनामध्ये एक खास नातं आहे. ती नेहमीच फराहला आई म्हणाताना दिसते. तर फराह कतरिनाला डार्लिग म्हणते. याआधी फराह आणि कतरिनानं ‘तीस मार खाँ’ या सिनेमातील शीला की जवानी या गाण्यासाठी एकत्र काम केलं होतं. याशिवाय कतरिना सूर्यवंशीचा दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबतही एक फोटो शेअर केला आहे.

VIDEO : अक्षय कुमारच्या ‘टिप-टिप बरसा पानी’वर आलिया भटचा हॉट डान्स

 

View this post on Instagram

 

The man , the magic, the MOVIES 🎥 @itsrohitshetty.. #sooryavanshi #nightshoots #towelseries

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

काही दिवसांपूर्वीच अक्षयनं ‘मोहरा’ सिनेमाच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याचे हक्क विकत घेतल्याचं सांगितलं होतं. हेच गाणं आता रिक्रिएट करून सूर्यवंशीसाठी वापरण्यात येणार आहे आणि रवीनाच्या जागी आता कतरिना पाहयाला मिळणार आहे. त्यामुळे या गाण्याबाबतची उत्सुकता वाढली आहे. हा सिनेमा 27 मार्च 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

=======================================================

करोडपतीच्या सेटवर सयाजी शिंदेंनी केला सरप्राईज संदर्भातला खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 03:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...