Home /News /entertainment /

कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींना अभिनयाशिवाय 'या' गोष्टींमध्ये आहे रुची,असा करतात मोकळ्या वेळेचा वापर

कतरिना कैफ ते प्रियांका चोप्रा या अभिनेत्रींना अभिनयाशिवाय 'या' गोष्टींमध्ये आहे रुची,असा करतात मोकळ्या वेळेचा वापर

सध्याच्या धावपळीच्या जगात मोकळा वेळ मिळणं (Free Time) फारच कठीण आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात गुंतलेला असतो. परंतु सुदैवाने मोकळा वेळ मिळाला तर, प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की मोकळ्या वेळेत करायचं काय? मोकळा वेळ नेमका कसा वापरायचा?

पुढे वाचा ...
    मुंबई, 12 मे- सध्याच्या धावपळीच्या जगात मोकळा वेळ मिळणं   (Free Time)  फारच कठीण आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या कामात गुंतलेला असतो. परंतु सुदैवाने मोकळा वेळ मिळाला तर, प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की मोकळ्या वेळेत करायचं काय? मोकळा वेळ नेमका कसा वापरायचा? तथापि काही लोक त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांच्या आवडत्या गोष्टी करतात, जसे की नृत्य करणे, संगीत ऐकणे. त्याच वेळी, काही लोकांना मोकळ्या वेळेत क्रिएटिव्ह काम करायला आवडतं. यामध्ये काही बॉलिवूड कलाकारांचासुद्धा (Bollywood Stars) समावेश आहे. बॉलिवूड कलाकारदेखील या बाबतीत इतरांपेक्षा वेगळे नाहीत. या कलाकारांनादेखील त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांच्या आवडत्या गोष्टी करायला आवडतात. बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल बोलायचे झाले तर काहींना मोकळ्या वेळेत चित्रे काढायला आवडतं, तर काहींना स्वयंपाक करायला आवडतं. काहींना गाणी ऐकण्याची आवड असते, तर काहींना वर्कआउट करायला आवडतं. तुमच्या आवडत्या अभिनेत्रींना मोकळ्या वेळेत काय करायला आवडतं ते तुम्हाला माहितेय का?आज आपण अशाच काही लोकप्रिय अभिनेत्रींच्याबाबतीत जाणून घेणार आहोत. प्रियांका चोप्रा- प्रियांका चोप्राने आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सगळ्यांना प्रियांकाची भुरळ पडली आहे. प्रियांकाला अभिनयासोबतच गाण्याचीही आवड आहे. तसेच प्रियंकाला फावल्या वेळेत फोटोग्राफी करायला आवडते. यासोबतच प्रियांकाला चांगली पुस्तके वाचायलाही आवडतात. कतरिना कैफ- बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नुकतंच अभिनेता विकी कौशलसोबत लग्नाच्या बेडीत अडकलीय. ती सध्या तिच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. कतरिनाला तिच्या मोकळ्या वेळेत संगीत ऐकायला आवडते. तसेच कोरोना काळात कॅटने गिटार वाजवण्याचे प्रशिक्षण घेतलं आहे. कतरिनाला मोकळ्या वेळेत गिटार वाजवणं आवडतं. जॅकलिन फर्नांडिस- सध्या वादात सापडलेलय जॅकलीन फर्नांडिसला चित्रकलेची खूप आवड आहे. याशिवाय तिला पुस्तके वाचायला खूप आवडतात. अलीकडेच जॅकलिनने सांगितले होते की, आजकाल ती घोडेस्वारीसुद्धा शिकत आहे. कंगना रणौत- अभिनेत्रीला फावल्या वेळात स्वयंपाक करायला आवडतं. तसेच, कंगनाला मोकळ्या वेळेत कल्ट क्लासिक चित्रपट पाहणं आवडतं. शिवाय मोकळ्या वेळेत तिला योगा करणं देखील आवडतं. कंगना सध्या तिच्या आगामी अॅक्शन थ्रिलर चित्रपट 'धाकड'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Jacqueline fernandez, Kangana ranaut, Katrina kaif, Priyanka chopra

    पुढील बातम्या