मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Merry Christmas: कतरिना कैफने सुरु केलं नवीन चित्रपटाचं शूटिंग; साऊथ सुपरस्टारसोबत झळकणार अभिनेत्री

Merry Christmas: कतरिना कैफने सुरु केलं नवीन चित्रपटाचं शूटिंग; साऊथ सुपरस्टारसोबत झळकणार अभिनेत्री

अभिनेता विकी कौशलसोबत   (Vicky Kaushal)  लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ   (Katrina Kaif)   आता पुन्हा तिच्या कामावर परतली आहे.

अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आता पुन्हा तिच्या कामावर परतली आहे.

अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आता पुन्हा तिच्या कामावर परतली आहे.

मुंबई, 25 डिसेंबर-   अभिनेता विकी कौशलसोबत   (Vicky Kaushal)  लग्न केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ   (Katrina Kaif)   आता पुन्हा तिच्या कामावर परतली आहे. विकीच्या आगामी चित्रपटाविषयी आधीच घोषणा करण्यात आली आहे. आता पत्नी कतरिनानेही तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. ख्रिसमसच्या   (Christmas)   खास मुहूर्तावर अभिनेत्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर पुढील चित्रपटाची माहिती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

लग्नानंतर कतरिना कैफने ज्या चित्रपटात काम करायला सुरुवात केली आहे, त्याचं नाव 'मेरी ख्रिसमस'   (Merry Christmas)  असं आहे. 'मेरी ख्रिसमस' सोबतचा एक फोटो शेअर करताना, अभिनेत्रीने लिहिलं आहे, "नवीन सुरुवात... मेरी ख्रिसमससाठी दिग्दर्शक #SriRamRaghavan सोबत सेटवर परतलो..मला नेहमीच श्रीराम यांच्यासोबत काम करायचं होतं. जेव्हा थ्रिलर चित्रपटांचं नाव येत तेव्हा ते नक्कीच आठवतात. ते यामध्ये मास्टर आहेत. त्यांच्याकडून या चित्रपटाचं दिग्दर्शन होणं ही एक सन्मानाची बाब आहे'. @rameshtourani आणि @sanjayoutraymatchbox निर्मित या चित्रपटासाठी @actorvijaysethupathi सोबत काम करण्यास उत्सुक आहे.' असं म्हणत कतरिनाने आपला आनंद व्यक्त केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

अंधाधुंद', 'बदलापूर' सारखे चित्रपट बनवणारे श्रीराम राघवन या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती कतरिनाच्या सोबत दिसणार असल्याची माहिती आहे. 'मेरी ख्रिसमस'मधून कतरिना आणखी एका तमिळ सुपरस्टारसोबत दिसणार आहे. यापूर्वी, ती तिच्या करिअरच्या सुरुवातीला दक्षिणेकडील मेगास्टार व्यंकटेश आणि नंदामुरी बालकृष्णासोबत दिसली आहे. तर दुसरीकडे विजय सेतुपतीचा हा दुसरा हिंदी चित्रपट आहे ज्यातून तो पुन्हा बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. यापूर्वी 2017 मध्ये त्याला 'मुंबईकर' साठी अप्रोच करण्यात आलं होत. जो अद्याप रिलीज झालेला नाही. आता तो कतरिनासह प्रेक्षकांना कशी भुरळ पाडतो हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

शूटिंगपूर्वी कतरिना मुंबईतील अंधेरी येथील विकीच्या पालकांच्या अर्थातच आपल्या सासू सासऱ्यांच्या घरी जाताना दिसली होती.कतरिना कैफ आणि विकी कौशलने ९ डिसेंबरला लग्नगाठ बांधली होती. त्यांनतर त्यांनी आपल्या लग्नाचे अनेक खास क्षण सोशल मीडियावर शेअर केले होते.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif