VIDEO : सेल्फी घेताना धक्काबुक्की करणाऱ्या चाहत्याला कतरिनानं असं केलं हॅन्डल

VIDEO : सेल्फी घेताना धक्काबुक्की करणाऱ्या चाहत्याला कतरिनानं असं केलं हॅन्डल

दिल्ली एअरपोर्टवर चाहत्यांनी कतरिना सेल्फी घेताना धक्काबुक्की करायला सुरुवात केली.

  • Share this:

मुंबई, 2 जुलै : ‘भारत’ सिनेमाला मिळालेल्या यशानंतर अभिनेत्री कतरिना कैफच्या चाहत्यांमध्ये बरीच वाढ झालेली दिसली. नुकतीच कतरिना कैफ दिल्ली एअरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी ती तिच्या गार्ड्ससोबत होती. मात्र तरीही तिच्या चाहत्यांनी तिला घराव घातलाच आणि सेल्फी घ्यायला सुरुवात केली. पण जेव्हा चाहते तिच्या जास्तच जवळ येऊ लागले तेव्हा मात्र कतरिना भडकली. तिचे गार्ड चाहत्यांना बाजूला करत होते पण चाहते मात्र ऐकायला तयार नव्हते. शेवटी कतरिनालाच या चाहत्यांना बाजूला करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला.

World Cup- खास रोहित शर्माचं शतक पाहायला ही मराठमोळी अभिनेत्री गेली इंग्लंडला

दिल्ली एअरपोर्टवर जेव्हा चाहत्यांनी कतरिना सेल्फी घेताना धक्काबुक्की करायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला तिच्या गार्ड्सनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. पण तरीही चाहत्यांनी तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी धक्काबुक्की सुरुच ठेवली. अखेर कतरिनानं स्वतःहून त्यांना बोट दाखवत लांब राहून सेल्फी घ्या असं सांगितलं. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

फिटनेससाठी दिशा पाटनी जीममध्ये गाळतेय घाम, पाहा व्हिडिओ

एका युजरनं लिहिलं, ‘आपल्या आवडत्या स्टारला पाहिल्यावर असं उत्साहित होणं स्वाभाविक आहे. मात्र सेल्फीसाठी अशाप्रकारे धक्काबुक्की करणं चुकीचं आहे. पण कतरिनानं योग्य प्रकारे त्यांना हॅन्डल केलं.’ तर दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘ती पण माणूस आहे. तिची स्वतःची प्रायव्हसी आहे आणि त्याचा आपण सन्मान करायला हवा.’ अशाप्रकारे गर्दीमध्ये अडकण्याची कतरिनाची ही पहिलीच वेळ नाही. आधीही एका सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी ती अशीच गर्दीत अडकली होती आणि त्यावेळी अक्षयनं तिला या गर्दीतून सुखरूप बाहेर काढलं होतं.

खिलाडी अक्षय कुमारला मुंबईच्या पावसाचा असा बसला फटका

 

View this post on Instagram

 

Singing in the rain ☔️ #sooryavanshi @akshaykumar @itsrohitshetty @farahkhankunder

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सध्या कतरिना तिचा आगामी सिनेमा सूर्ववंशीच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात ती अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टी दिग्दर्शित करत असून यात मोहरा सिनेमातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. नुकतच या गाण्याचं शूट पूर्ण झालं आहे.

================================================================

VIDEO: अमिताभ बच्चन यांच्या घरासमोरही साचलं गुडघाभर पाणी

First published: July 2, 2019, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading