मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

लग्नाच्या चर्चेदरम्यान पार्टी एन्जॉय करताना दिसली कतरिना कैफ; VIDEO सोशल मीडियावर VIRAL

लग्नाच्या चर्चेदरम्यान पार्टी एन्जॉय करताना दिसली कतरिना कैफ; VIDEO सोशल मीडियावर VIRAL

कतरिना कैफ   (Katrina Kaif)  आणि विकी कौशलचे   (Vicky Kaushal)  लग्न चर्चेत आहे. या जोडप्याच्या कोर्ट मॅरेजच्या बातम्यांदरम्यान, त्यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये कतरिना कैफ पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई,4 डिसेंबर-   कतरिना कैफ   (Katrina Kaif)  आणि विकी कौशलचे   (Vicky Kaushal)  लग्न चर्चेत आहे. या जोडप्याच्या कोर्ट मॅरेजच्या बातम्यांदरम्यान, त्यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये कतरिना कैफ पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. अशी अपेक्षा आहे की कोर्ट मॅरेजनंतर विकी आणि कतरिना त्यांच्या मित्र आणि कुटुंबासह वीकेंडला राजस्थानला जातील.

व्हिडिओमध्ये कतरिनाने काळ्या रंगाचा चमकदार ड्रेस परिधान केला आहे. पार्श्वभूमीत छान संगीत वाजत आहे. व्हिडिओमध्ये नेटिझन्स कतरिनाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. पिंकविलाने जवळच्या स्त्रोताचा हवाला देत सांगितले की, “कतरिना आणि विकी आज किंवा उद्या मुंबईत कोर्ट मॅरेजसाठी जाणार आहेत. ज्यात जोडप्याच्या कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित असतील. जर त्यांनी लग्न केले तर ते स्पेशल मॅरिज, 1954 अंतर्गत असेल. विवाह निबंधकाच्या उपस्थितीत जोडप्याचे तीन साक्षीदार घोषणापत्रावर स्वाक्षरी करतील.तसेच कोर्ट मॅरेजनंतर ते वीकेंडला मित्र आणि नातेवाईकांसह राजस्थानला जातील.

स्टार फोटोग्राफर विरल भयानीने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विकी कौशल कारमधून कुठेतरी जाताना दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'विकी कौशल आज कतरिनाच्या घरी दिसला.' तुम्हाला सांगू इच्छितो की या जोडप्याच्या लग्नात सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाला आमंत्रित करण्यात आल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा जी कतरिना कैफची जवळची मैत्रीण आहे. तिने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आम्हाला लग्नाचे कोणतेही आमंत्रण मिळालेले नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह सोहळा राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथील शाही महालात होणार आहे. हे जोडपे सब्यसाचीने डिझाईन केलेला ड्रेस घालणार असल्याची माहिती आहे.कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचे पाहुणे कलाकार करण जोहर, अली अब्बास जफर, कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा ,कियारा अडवाणी, वरुण धवन आणि नताशा दलाल आहेत.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal