मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Katrina Kaif ने शाळकरी मुलांसोबत घालवला वेळ; साऊथ गाण्यावर केला भन्नाट डान्स, पाहा VIDEO

Katrina Kaif ने शाळकरी मुलांसोबत घालवला वेळ; साऊथ गाण्यावर केला भन्नाट डान्स, पाहा VIDEO

katrina kaif

katrina kaif

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरत असते. अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकल्यापासून ती अधिक चर्चेत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Sayali Zarad

मुंबई, 26 सप्टेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरत असते. अभिनेता विकी कौशलसोबत लग्नबंधनात अडकल्यापासून ती अधिक चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगलेली पहायला मिळतेय. अशातच कतरिनाचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री शाळकरी मुलांसोबत डान्स करत आहे.

कतरिनाच्या नव्या व्हिडीओने सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ माउंटन व्ह्यू स्कूलचा आहे. कतरिनाने नुकतंच तिच्या आईच्या शाळेत माउंटन व्ह्यू स्कूलमध्ये हजेरी लावली. यावेळी ती शाळेतील मुलांसोबत वेळ घालवताना दिसली. यावेळी तिनं मुलांसोबत डान्सही केला. साऊथ गाण्यावर कतरिना थिरकताना दिसली. याचाच व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

कतरिना  ज्या पद्धतीने मुलांमध्ये साधेपणाने एन्जॉय करत आहे, त्याला सोशल मीडियावर लोक पसंत करत आहेत. यूजर्स तिचे खूप कौतुक करताना दिसतायेत. तिच्या या साधेपणावर तिचे चाहते फिदा झाले आहेत. व्हिडीओवर भरभरुन लाईक्स आणि कमेंट येत आहेत.

वंचित विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी, रिलीफ प्रोजेक्ट इंडियाचा भाग म्हणून 2015 मध्ये तामिळनाडूमधील माउंटन व्ह्यू स्कूल उघडण्यात आले. कैफची आई सुझान दीर्घ काळापासून शाळेशी जोडलेली आहे आणि तिथे शिकवते.

First published:

Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Katrina kaif