मलायकानंतर आता कतरिनाचं न्यूड शेड जिमसूटमध्ये फोटोशूट, दोघींंच्याही पोस्ट सोशल मीडियावर VIRAL

मलायकानंतर आता कतरिनाचं न्यूड शेड जिमसूटमध्ये फोटोशूट, दोघींंच्याही पोस्ट सोशल मीडियावर VIRAL

मलायकाला ज्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं, त्याच जीमलूकमध्ये कतरिनाही दिसल्याने फॅन्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 15 मार्च : मलायका अरोरा (Malaika Arora) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या दोन्हीही अभिनेत्रींची नावं सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. दोघींचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी मलायकाचा असाच एक बोल्ड व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती जिम आउटफिट्समध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हिडीओ Viral Bhayani ने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका जीममध्ये जाताना दिसत आहे. मात्र तिच्या जीम आउटफिट्सचा कलर तिच्या स्किन कलरशी एवढा मिळता जुळता आहे की त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. याच लुकवरुन मलायकाला जोरदार ट्रोल केलं गेलं. याच लूकमध्ये कतरिना सुद्धा दिसल्याने त्या दोघींच्या फॅन्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

View this post on Instagram

 

Spaceman take me up with you as there is a pandemic 😢. #malaikaarora 🎼 #jassmann @babylonzoo.official #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर सुद्धा तिच्या या स्कीन कलर आउटफिटचे फोटो शेअर केले होते. कपड्यांवरून अनेकदा ट्रोल होणारी मलायका याहीवेळी ट्रोल झाली. काही फॅन्सना तिचा हा लूक बोल्ड देखील वाटला.

मलायकाबरोबरच याच सेम लूकमध्ये दुसरी अभिनेत्री पाहायला मिळाली ती म्हणजे कतरिना कैफ. कतरिनाने सुद्धा स्कीन कलर जीमसूटमध्ये फोटोशूट केलं आहे. त्यामुळे तिचे फॅन्स देखील अचंबित झाले आहेत.

कतरिना कैफ लवकरच अक्षय कुमारबरोबर 'सूर्यवंशी' (Sooryavanshi) या चित्रपटामध्ये दिसणार आहे. येत्या 24 मार्चला या सिनेमा प्रदर्शित होणार होता, मात्र कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) मुळे अनिश्चित काळासाठी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. तर मलायका सोनी टिव्हीवरील 'इंडियाज बेस्ट डान्सर' या शोमध्ये परिक्षक आहे. दोघींचे फिल्म इंडस्ट्री तसंच सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या फोटोनंतर हा जीमलूक कुणी चांगल्या पद्धतीने कॅरी केला आहे, यावरून चर्चा होताना दिसत आहे.

First published: March 15, 2020, 6:15 PM IST

ताज्या बातम्या