Home /News /entertainment /

Vicky Kaushal-Katrina Kaif लग्नाला एक महिना पूर्ण, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

Vicky Kaushal-Katrina Kaif लग्नाला एक महिना पूर्ण, फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

 Vicky Kaushal-Katrina Kaif

Vicky Kaushal-Katrina Kaif

अभिनेता विकी कौशल( Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif ) यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे.

  नवी दिल्ली, 9 जानेवारी: अभिनेता विकी कौशल( Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif ) यांच्या लग्नाला एक महिना पूर्ण झाला आहे. अजूनही या दोघांच्या लग्नाचा फिव्हर बी टाऊनमध्ये पाहायाला मिळता आहे. दोघांनी आजच्या दिवशीच म्हणजेच 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. दरम्यान, अभिनेत्री कतरिना आपल्या लग्नाला महिना पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करताना दिसत आहे. कतरिनाने विकीसोबतचा रोमँटीक फोटो शेअर करत आपल्या लग्नाला एक महिना पूर्ण झाली असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. फोटोमध्ये दोघे एकमेकांच्या मिठीमध्ये दिसत आहेत. इतकेच नव्हे तर तिने कॅप्शनदेखील दिली आहे. Happppyyyyy one month my ❤️असे तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. कतरिनाने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे तर विकी निळ्या रंगाच्या फुल स्लीव्ह टी-शर्टमध्ये दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

  त्यांच्या या फोटोला अर्ध्यातासांत 10 लाखापेक्षा अधिक चाहत्यांनी लाईक्स केले आहे. तिच्या या पोस्टवर नेहा धुपिया हिनेदेखील कमेंट केला आहे. खुप खुप शुभेच्छा माझ्या सुंदर कपलला, मी खूप तुमच्यावर प्रेम करते. असे नेहाने कमेंटमध्ये म्हटले आहे. नुकतींच ती मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. लग्नाला एक महिना पूर्ण झाल्यामुळे एका खास सेलिब्रेशनसाठी कतरिना आपल्या पतीसोबत वेळ घालवण्यासाठी इंदूरला पोहोचली असल्याचा अंदाज चाहत्यांनी लावला आहे. राजस्थानातील सवाई माधोपूरमध्ये विकी व कतरिनाचा शाही विवाहसोहळा पार पडला.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या