S M L

ठरलं !,'ही' अभिनेत्री असणार 'भारत'मध्ये,सलमानने केलं 'स्वागत'

Updated On: Jul 30, 2018 11:32 PM IST

ठरलं !,'ही' अभिनेत्री असणार 'भारत'मध्ये,सलमानने केलं 'स्वागत'

मुंबई, 30 जुलै : देसीगर्ल प्रियांका चोप्राने 'भारत' सिनेमातून काढता पाय घेतल्यानंतर तीचा जागा कोण घेणार अशी चर्चा सुरू असताना खुद्ध सलमान खानने आता या चर्चेवर पडदा पाडलाय. सलमानने फेसबुकवर 'या' अभिनेत्रीचा फोटो पोस्ट करत कतरिना कैफ ही भारत सिनेमात असेल असं जाहीर केलंय.

अखेर 'भारत'मधल्या अभिनेत्रीचं नाव फायनल झालं.  कतरिना कैफ या सिनेमात आता प्रियांकाच्या जागी असणार आहे. सलमान खानने रात्री आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केलीये. "एक सुंदर आणि सुशील मुलगी जिचं नाव आहे कतरिना कैफ...स्वागत आहे तुझं भारतच्या जिवनात असं म्हणत सलमानने कतरीनाचा फोटो शेअर केलाय.

Loading...

तसंच दिग्दर्शक अली अब्बासनं मुंबई मिररशी बोलताना सांगितलं होतं की, ' मी कतरिनासोबत काम करायला खूप खूश आहे. कतरिना आणि सलमान एकत्र पडद्यावर आले की एकदम हिट जोडी ठरते.'

हेही वाचा

कोण आहे सर्वात श्रीमंत? प्रियांका की निक?

VIDEO : ... अन् आनंद आहुजानं सोनमला उचलून घेतलं

PHOTOS : अभिनेत्री ऋचा चड्डा शकिलाच्या भूमिकेत 'अशी' दिसेल!

अली, सलमान आणि कतरिना तिघांनी एकत्र काम 'टायगर जिंदा है'मध्ये केलं होतं. सलमान-कॅट दबंग, एक था टायगर, मैने प्यार क्यूं किया अशा सिनेमांमध्ये एकत्र होते. सलमान आणि कतरिनाचं अफेअरही गाजलं होतं. सलमानला कतरिनाबद्दल साॅफ्ट काॅर्नर आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहे.

सलमान खानच्या 'भारत'चं शूटिंग सुरू झालंय आणि सिनेमातला सलमानचा लूकही समोर आलाय. प्रियांका चोप्राही मेहबूब स्टुडिओत काही दिवसांपूर्वी दिसली होती. भारत सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. सलमान खान या सिनेमात 5 लूकमध्ये दिसणार आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 65 पर्यंतचा त्याचा प्रवास या सिनेमात आहे.

याशिवाय टायगर जिंदा है नंतर सलमान-कतरीनाची जोडी  धूम 4 मध्येही दिसणार अशी चर्चा आहे. धूम 3मध्ये आमीर खानसोबत कतरिनाची जोडी होती, त्यामुळे कतरिनासाठी धूमची सीरिज काही नवी नाही. सलमान खान धूम 4 करणार हे ठरल्यावर सलमान खानसोबत कतरिनाच्या नावाची वर्णी लागणं हे काही फार धक्कादायक नाही. कारण कतरिना ही सलमानची खास मैत्रीण आहे आणि सलमान-कतरिनाची ऑन स्क्रिन जोडी प्रेक्षकांना पहायला आवडते.

त्यामुळे यशराजनेही सलमान-कतरिना जोडीलाच प्राधान्य द्यायचं ठरवलेलं दिसतंय. सलमान-कॅटच्या चाहत्यांसाठी ही एक धमाल ट्रीट असू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 30, 2018 11:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close