Home /News /entertainment /

अरेच्चा! कतरिनाने झटकन डिलीट केला 'तो' PHOTO; तिच्याही नकळत उमटलं होतं कथित बॉयफ्रेंडचं प्रतिबिंब

अरेच्चा! कतरिनाने झटकन डिलीट केला 'तो' PHOTO; तिच्याही नकळत उमटलं होतं कथित बॉयफ्रेंडचं प्रतिबिंब

सोशल मीडियावर सेलिब्रिटीजच्या चाहत्यांपासून क्वचितच काही लपून राहतं. आता पुन्हा एकदा या बाबीचा प्रत्यय आला आहे.

  मुंबई, 4 जानेवारी : बॉलीवूडमधल्या स्टार्सच्या (bollywood stars) अफेअरच्या चर्चा ही कायम 'इन' असलेली गोष्ट. सध्या अशाच दोन लोकप्रिय स्टार्समधील हळूवार नात्याबाबत बोललं जातं आहे. त्यात पुन्हा एकदा दोघांचं नाव एकत्र चर्चिलं जाण्याला एक निमित्त नुकतंच मिळालं.ही दोन नावं म्हणजे कटरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal). कटरिना आणि विकी कौशल यांच्याबाबत बऱ्याच काळापासून दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. पार्टी, इवेन्टस अशा अनेक प्रसंगांमध्ये या दोघांना एकत्र बघितलं जात आहे. अजून दोघांनी आपल्या नात्यावर औपचारिकपणे शिक्कामोर्तब केलं नाही. दोघांमध्ये नेमकं काय शिजतंय ही बाब अद्याप गुलदस्त्यातच आहे. मात्र या अवस्थेत नातं असताना कटरिनानं नुकतीच एक 'गलतीसे मिस्टेक' केली. त्यातून अजून एकदा चर्चांना उधाण आलं आहे. झालं असं, की कटरिनानं इन्स्टाग्रामवर (Instagram) एक फोटो (photo) पोस्ट केला. न्यू इयर सेलिब्रेशनबाबतचा (new year celebration)  हा फोटो आहे. यात कतरिना आणि तिची बहीण इसाबेल हिच्यासोबत बसलेली दिसते आहे. दोघी सेलिब्रेशनचा आनंद घेत आहेत. फोटोत तसं पाहिल्यास दोघीच आहेत. मात्र नकळत अजून काही जण या फोटोत डोकावत आहेत. दोघींच्या मागे असलेल्या काचेत या काहीजणांचं प्रतिबिंब उमटलं आहे.
  या प्रतिबिंबात दिसणाऱ्या लोकांमध्ये एक आहे विकी कौशल! हा फोटो कटरिनानं इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र काही वेळातच तिला तिची 'चूक' लक्षात आली असावी. तिनं काही वेळातच लगोलग हा फोटो डिलीटही केला. अर्थातच डिलीट करण्यापूर्वी कटरिनाच्या असंख्य चाहत्यांनी हा फोटो पाहिला नसता तरच नवल! या चाणाक्ष चाहत्यांनी मागच्या काचेत दिसणाऱ्या विक्की कौशललाही अचूक हेरलं. आता पाहता-पाहता हा मजेदा फोटो सोशल मीडियावर व्हायरलदेखील झालाय. फोटोत इसाबेल आणि कटरिना 'गेम ऑफ सिक्वेन्स' खेळत आहेत. अर्थात, हे काही पहिल्यांदा घडलं नाही, की विक्की कौशल कटरिनाच्या घरी आला आहे. विक्कीचं गेल्या बऱ्याच काळापासून कटरिनाच्या घरी येणं-जाणं वाढलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Instagram, Katrina kaif

  पुढील बातम्या