कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर दीपिका म्हणाली ‘स्टॉप इट’

कतरिना कैफच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर दीपिका म्हणाली ‘स्टॉप इट’

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीरने लग्न केलं होतं. लग्नाच्या रिसेप्शनला त्यांनी कतरिनाला आमंत्रण दिलं होतं.

  • Share this:

मुंबई, ०३ फेब्रुवारी २०१९- बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्लो- मोशनमधला व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये पोझ देताना दिसते. ‘विकेण्डमध्ये प्रवेश करताना काहीसं असं...’ असं कॅप्शन दीपिकाने या व्हिडिओला दिलं. या व्हिडिओमध्ये कतरिना इतकी मादक दिसत आहे की इतर कलाकारही तिचं कौतुक करायला स्वतःला रोखू शकले नाही.

एका फोटोशूटदरम्यानचा हा व्हिडिओ आहे. यात कतरिना फारच सुंदर दिसत आहे. कतरिनाच्या या व्हिडिओवर दीपिका पदुकोणनेही प्रतिक्रिया देत म्हटलं की, ‘स्टॉप इट.’ यानंतर तिने हार्टवालं इमोजी टाकलं.

 

View this post on Instagram

 

Heading into the weekend (with a dash of red) like......

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

३३ वर्षीय दीपिकाच्याशिवाय वरुण धवन आणि दिया मिर्झा यांनीही कतरिनाच्या या पोस्टवर कमेंट केली. दोघांनीही इमोजीचा वापर करून तिचा फोटो किती चांगला आहे ते सांगितलं. कतरिनाच्या या फोटोवर आतापर्यंत १२ लाख लाइक्स मिळाले आहेत. तर अनेकांनी तिच्या या व्हिडिओवर चांगल्या कमेंट दिल्या आहेत.

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीरने लग्न केलं होतं. लग्नाच्या रिसेप्शनला त्यांनी कतरिनाला आमंत्रण दिलं होतं. कतरिना आणि दीपिका यांच्यात चांगले मैत्रीपूर्व संबंध आहेत. कॉफी विथ करणच्या सहाव्या सीझनमध्ये कतरिना करणला म्हणाली होती की, ती रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाबाबद फार उत्सुक आहे. पण तिला अजूनपर्यंत आमंत्रण मिळालेलं नाही.

कतरिना लवकरच सलमान खानसोबत ‘भारत’ सिनेमात दिसणार आहे. अली अब्बासचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे. यापूर्वी अली अब्बासबरोबर कतरिना आणि सलमानने ‘टायगर जिंदा है’ सिनेमात काम केलं. यावर्षी ईदला ‘भारत’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

रणवीर मागोमाग अनिल कपूरही झाले 'गली बॉय'; VIDEO VIRAL

First published: February 3, 2019, 3:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading