Home /News /entertainment /

आपल्या लग्नापासून एक्स बॉयफ्रेंडसना दूर ठेवत आहे कतरिना; सलमाननंतर रणबीरचाही नसणार समावेश

आपल्या लग्नापासून एक्स बॉयफ्रेंडसना दूर ठेवत आहे कतरिना; सलमाननंतर रणबीरचाही नसणार समावेश

गेल्या काही दिवसांपासून 'बी टाउन'मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाबाबत (Marriage) जोरदार चर्चा सुरू आहेत.

   मुंबई, 3डिसेंबर-    गेल्या काही दिवसांपासून 'बी टाउन'मध्ये अभिनेत्री कतरिना कैफ   (Katrina Kaif)   आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाबाबत (Marriage) जोरदार चर्चा सुरू आहेत. डिसेंबर (2021) महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये दोघं राजस्थानमधल्या जोधपूर शहरातल्या 'सिक्स सेन्स फोर्ट'मध्ये (Six Senses Fort) लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या लग्नाला कोण-कोण उपस्थित राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची गेस्ट लिस्ट (Guest list) समोर आली आहे. या लिस्टमध्ये अभिनेता सलमान खान  (Salman Khan)   आणि त्याच्या कुटुंबाचं नाव नसल्याचं म्हटलं जात आहे. सलमानसोबतच आणखी एक प्रसिद्ध नाव या लिस्टमधून गायब असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अभिनेता रणबीर कपूरलादेखील  (Ranbir Kapoor)  विकी-कतरिनाच्या लग्नाचं निमंत्रण   (Invitation)  मिळालेलं नाही. 'दैनिक जागरण'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding update
  Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding update
  सध्या सर्वत्र विकी कौशल आणि कतरिनाच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत; मात्र त्या दोघांनी अद्याप याबाबत काहीही वक्तव्य केलेलं नाही. लग्नाला येण्याऱ्या पाहुण्यांसाठी राजस्थानमध्ये 45 हॉटेल्स बुक केल्याचीही माहिती मिळत आहे. दोघांच्या लग्नासाठी अनेक व्हीआयपी गेस्ट येण्याची शक्यता आहे; मात्र कतरिनानं अद्याप सलमान खानच्या कुटुंबाला निमंत्रण पाठवलेलं नाही. सलमानची बहिण अर्पितानं (Arpita Khan) याला दुजोरा दिला आहे. अद्याप खान कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला कतरिनाच्या लग्नाची पत्रिका मिळालेली नाही. त्यामुळे आम्ही लग्नाला जाणार नाही, असं अर्पितानं ई-टाइम्सला सांगितलं आहे. कतरिनानं खान कुटुंबाला का बोलावलं नाही, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण, सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतरही कतरिनानं त्याच्यासोबत अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्याच्यासोबत बसून अनेक मुलाखतीही दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच ती 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी 'बिग बॉस'मध्येही आली होती. (हे वाचा:Katrina -Vicky Wedding:सवाई माधोपूरच्या DM नी सुरक्षेबाबत बोलावली बैठक ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, कतरिनानं सलमानसह आपला एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरलाही बोलवलेलं नाही. आपल्या प्रोफेशनॅलिझमसाठी ओळखल्या जाणाऱ्या कतरिनानं रणबीरला निमंत्रण न देणं हे धक्कादायक आहे. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतरही कतरिनानं अनुराग बसूच्या जग्गा जासूसचं शूटिंग पूर्ण केलं होतं. इतकंच नाही, तर अनेक मुलाखतीही दिल्या होत्या. रणबीरला निमंत्रण नसल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळं आता आलिया भटला निमंत्रण मिळालं आहे की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अद्याप कपूर फॅमिलीतल्या कुणीही निमंत्रण न मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. आतापर्यंत करण जोहर, फराह खान, अनुष्का शर्मा, विराट कोहली, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांना लग्नाचं निमंत्रण मिळाल्याची माहिती समोर आली आहे.सलमान आणि रणबीर यांना निमंत्रण न मिळाल्याच्या बातम्या खऱ्या असतील तर कतरिनानं आपल्या एक्स बॉयफ्रेंड्सना जाणीवपूर्वक लग्नापासून दूर ठेवलं असं म्हणता येईल.
  First published:

  Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या