मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कतरिनाकडे आहे कोट्यावधींची संपत्ती! अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेते तब्बल इतकं मानधन

कतरिनाकडे आहे कोट्यावधींची संपत्ती! अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेते तब्बल इतकं मानधन

 'सूर्यवंशी'   (Sooryavanshi)  हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. कतरिना  (Katrina Kaif)  सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीतून तिनं हे स्थान मिळवलं आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 नोव्हेंबर-   'सूर्यवंशी'   (Sooryavanshi)  हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. कतरिना  (Katrina Kaif)  सध्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीतून तिनं हे स्थान मिळवलं आहे. बॉलीवूडचे अनेक अभिनेते तिच्या स्टारडमसमोर फिके पडलेले दिसतात. कतरिनाने तिच्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरमध्ये बहुतांश मोठ्या निर्मात्यांसोबत काम केले आहे. कतरिना एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेते. तिची एकूण संपत्ती जाणून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.

2003 मध्ये कतरिना कैफने 'बूम'  (Boom)  या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने खूप ग्लॅमरस सीन्स दिले होते. पण तरीही हा चित्रपट बॉक्समध्ये फ्लॉप ठरला. 2004 मध्ये आलेल्या 'सरकार' चित्रपटातून तिने हे सिद्ध केले की ती केवळ ग्लॅमरस सीनसाठी बनलेली नाही तर ती उत्कृष्ट अभिनयही करू शकते. आतापर्यंत तिने जवळपास 40 चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये अनेक चित्रपट सुपर डुपर हिट ठरले आहेत. रिपोर्ट्सनुसार, सध्या कतरिना एका चित्रपटासाठी जवळपास 11 कोटी रुपये इतकी फी घेते.

कतरिनाची एकूण संपत्ती-

कतरिना केवळ चित्रपटांसाठीच करोडो रुपये घेते असे नाही. तर ती जाहिरातींमधूनही कोट्यवधींची कमाई करते. कोणत्याही एका ब्रँडला एंडोर्स करण्यासाठी कतरिनाला 6 ते 7 कोटी रुपये लागतात, असं म्हटलं जातं. सध्या या अभिनेत्रीची एकूण संपत्ती 224 कोटी रुपये आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मायानगरीत स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते. कतरिना करोडोंमध्ये कमावते पण तरीही ती आजही भाड्याच्या घरात राहते. यासाठी कतरिना दरमहा लाखो रुपये देते.

(हे वाचा:Sooryavanshi' BOX OFFICE: रिलीजच्या 11 व्या दिवशीही झाला पैशांचा पाऊस )

कतरिना कैफ लवकरच अभिनेता विकी कौशलसोबत लग्न करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. वर्षाच्या अखेरीस कतरिना कैफ विकीची वधू बनेल अशी अपेक्षा आहे. त्यांच्या लग्नाच्या तारखेच्या घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

First published:

Tags: Bollywood actress, Entertainment, Katrina kaif