Home /News /entertainment /

VIDEO : कतरिनाच्या आईचा शॉपिंग करताना पडला फोन, लोकांनी काढला भलताच अर्थ

VIDEO : कतरिनाच्या आईचा शॉपिंग करताना पडला फोन, लोकांनी काढला भलताच अर्थ

कतरिना कैफ-विकी कौशल यांच्या शाही लग्नाआधी आज कतरिना कैफची आई सुझान टर्कोटे यांचा (Katrina Kaif Mother Suzanne Turquotte) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या शॉपिंगला जाताना दिसत आहे.

  मुंबई, 29 नोव्हेंबर: कतरिना कैफ-विकी कौशल (Katrina Kaif-Vicky Kaushal wedding) यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. 7-8-9 डिसेंबरला कॅट आणि विकी दोघेही राजस्थानमध्ये (Rajasthan) शाही पद्धतीने लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांच्या यादीसोबतच स्थळ, मेहंदी, संगीताशी संबंधित अनेक बातम्या समोर आल्या आहेत.पण या शाही लग्नाआधी आज कतरिना कैफची आई सुझान टर्कोटे यांचा (Katrina Kaif Mother Suzanne Turquotte) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या शॉपिंगला जाताना दिसत आहे. यावेळी कारमध्ये बसताना असे काही झाले की, लोकांना त्याची काळजी वाटू लागली. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कतरिना कैफच्या आईचा एक व्हिडिओ पापाराझी विरल भयानीने त्याच्या इन्स्टावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्याने कॅप्शन दिले आहे की, #katrinakaif ची आई शहरात खरेदी करताना दिसली. या व्हिडिओमध्ये कतरिनाची आई Suzanne Turquotte दिसत आहे. त्या एका दुकानातून बाहेर आल्या आणि मीडियावाल्यांनी त्यांची एक झलक कॅमेऱ्याचत टिपली. वाचा : Wedding update: विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाची लगबग सुरू, 'हे' सेलेब्स लावणार हजेरी यानंतर त्या कारचा दरवाजा उघडून त्या आत बसल्या. जेव्हा त्यांनी गाडीचा दरवाजा बंद केला. तेव्हा त्यांचा फोन खाली पडतो आणि गाडी पुढे जाते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक चिंतेत आहेत, तर काही नेटकरी म्हणतायत की त्यांना कदाचित फोनची गरज नव्हती. एका यूजरने लिहिले आहे की, फोन परत घेतला की नाही ते सांग, नाही तर मी येते घ्यायला. दुसर्‍याने लिहिले आहे की - फोन पाहा, विकी आणि कतरिनाच्या लग्नाची पाहुण्यांची यादी असेल. एकाने लिहिले आहे की, आता त्या खरेदी कशी करणार. त्याचवेळी, काही लोक चिंतेत आहेत. लोकांनी त्यांना त्यांच्या पडलेल्या फोनची माहिती तेव्हाच द्यायला हवी होती असं काही लोकांच मत आहे.
  कतरिना कैफ आणि विकी कौशल कदाचित त्यांच्या लग्नाची अधिकृत घोषणा करणार नाहीत. मात्र नुकतीच दोघांच्या लग्नातील पाहुण्यांची यादी समोर आली आहे. ज्यामध्ये क्रिकेटर विराट कोहलीसह शशांक खेतान, करण जोहर, फराह खान, वरुण धवन, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, कबीर खान आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटी असल्याचे सांगण्यात आले आहे. कोहली आणि अनुष्का शर्मा या लग्नात सहभागी होणार आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या