Home /News /entertainment /

'हिच्यापेक्षा तर दीपिका चांगली....', Katrina Kaif एअरपोर्ट लुकमुळे होतेय ट्रोल

'हिच्यापेक्षा तर दीपिका चांगली....', Katrina Kaif एअरपोर्ट लुकमुळे होतेय ट्रोल

कतरिना कैफ नुकतीच विमानतळावर स्पॉट झाली आहे. यावेळी तिच्या साध्या पण तितक्याच सुंदर लुकने चाहत्यांचे लक्ष वेधले. तर काहींने ट्रोल देखील केलं आहे.

  मुंबई, 22 जानेवारी- कतरिन कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल ( Vicky Kaushal) लग्नानंतर कोणत्या कोणत्या गोष्टींवरून नेहमी चर्चेक असतात. लग्नानंतर बॉलिवूडचं हे स्वीट कपल एकमेकांना जास्त वेळ देऊ शकलेले नाही. कारण विकी त्याच्या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. मात्र जेव्हा या दोघांना वेळ भेटतो तेव्हा दोघेही एकत्र वेळ घालवत असतात. नवीन वर्ष साजरं करण्यासाठी विकी कतरिनासाठी मुंबईत आला होता. त्यावेळी कतरिना विकीला बाय करण्यासाठी विमानतळावर आली होती. आता पुन्हा एकदा कतरिना विमानतळावर स्पॉट झाली आहे. यावेळी तिच्या साध्या पण तितक्याच सुंदर लुकने चाहत्यांचे लक्ष वेधले. याशिवाय चाहत्यांना हा देखील प्रश्न पडला आहे की, मॅडम नेमक्या निघाल्या आहे तरी कुठे? तर काहींने ट्रोल देखील केलं आहे. कतरिना शनिवारी सकाळी मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी नेहमीप्रमाणे ती पापाराझीच्या कॅमेरात कैद झाली. पापाराझींना तिनं निराश केले नाही. यावेळी थांबून ती कॅमेरांना पोझ देताना दिसली. हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. यावेळी तिचा लुक अगदी साधा होता. ना टिकली, ना चुडा पण तरीही ती सुंदर दिसत होती. याशिवाय कोरोनापासून काळजी म्हणून तिनं मास्क आणि फेसशील्ड देखील घातले होते. व्हायरल होत आहे हा व्हिडिओ 'विरल भयानीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस पडत आहे. नेहमीप्रमाणे कतरिना सुंदरतेने सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. एका चाहत्यांने म्हटले आहे की, वहिनीसाहेब नेहमी एक नंबर दिसतात. तर आणखी एकाने म्हटलं आहे की. नेहमीप्रमाणे सुंदर.. तर असचं एकाने विचारले आहे की, काय इंदूरला निघाला की काय? विकी दाजींकडं..तर काहींनी तिला ट्रोल देखील केलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, फिरंगी असल्याचे सिद्ध केल...ना चुडा घातलाय..ना टिकली लावली आहे. हिच्यापेक्षा तर दीपिका चांगली, कमीत कमी आडीच महिने चुडा तरी घातला होता.
  यापूर्वी कतरिना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. त्यावेळी ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. ज्यामध्ये ती खूपच स्टाईलिश दिसत होती. तिच्या कामाबद्दल सांगायचे तर, कतरिना लवकरच ‘फोन भूत’, ‘जी ले जरा’ आणि सलमान खानसोबत ‘टायगर 3’ मध्ये दिसणार आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या