मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

गोड सुरुवात! कतरिना कैफनं पती विकीसाठी बनवला शिरा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

गोड सुरुवात! कतरिना कैफनं पती विकीसाठी बनवला शिरा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

 विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतर (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding) त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. कतरिनाने आपल्या नवीन घरात पती आणि कुटुंबातील नवीन सदस्यांसाठी गोड पदार्थ बनवला आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 डिसेंबर-   विकी कौशल आणि कतरिना कैफ लग्नानंतर (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding) त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. कतरिनाने आपल्या नवीन घरात पती आणि कुटुंबातील नवीन सदस्यांसाठी गोड पदार्थ बनवला आहे. त्याचा एक फोटो तिनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिनं हा गोड पदार्थ (Sweet Dish) आपण स्वतः बनवला असल्याचं सांगितलं आहे. या फोटोमध्ये तिनं शिऱ्याने भरलेली वाटी हातात घेतल्याचं तुम्हाला दिसेल. फोटोमध्ये सुंदर बाल्कनीही दिसत आहे.

कतरिना कैफनं आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर करत लिहिलं आहे, 'मी बनवलं'. तसेच कतरिनाने या चालीरीतील विकीच्या घरात कोणत्या नावाने ओळखलं जातं त्याचा उल्लेख केला आहे. विकीकडे या विधीला 'चौका चारधाना' असं म्हटलं जात.'कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये लग्न आणि मालदीवमध्ये हनिमून करून नुकताच मुंबईत परतले आहेत.

गेल्या काही आठवड्यांपासून बीटाउनमध्ये ज्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर ते लग्न 9 डिसेंबर रोजी पार पडलं. बॉलिवूडमधील मोस्ट अवेटेड लग्न राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे झालं. लग्नानंतर विकी आणि कतरिनाने आपल्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या या नवीन प्रवासाबद्दल सर्वांना सांगितलं होतं. आपल्या रिलेशनशिपला सिक्रेट ठेवत या दोघांनी थेट लग्न करूनच सर्वांना सुखद धक्का दिला होता. अर्थात यांच्या लग्नाच्या आणि अफेयरच्या चर्चा अनेक महिन्यांपासून सुरु होत्या, मात्र त्या दोघांनी कधीही त्याची अधिकृत घोषणा केलेली नव्हती.

तसेच लग्नानंतर हे नवदांपत्य आपल्या जुहूमधील नवीन घरात राहत आहे. विशेष म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली त्यांचे शेजारी आहेत. काही दिवसांपूर्वी अनुष्काने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विकी-कतरिना यांच्या लग्नातील एक फोटो शेअर केला होता. आणि त्यावर लिहिलं होतं, "तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. तुम्ही आयुष्यभर सोबत राहा". अनुष्कानं पुढं म्हटलं होतं, "अखेर तुम्ही लग्न केलं आहे आणि आता लवकरच आपल्या नव्या घरात याला. म्हणजे आता आम्हाला कन्स्ट्रक्शनचा आवाज ऐकू येणार नाही".

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal