अक्षय कुमारने शेअर केला फोटो, तब्बल सहा वर्षांनंतर या अभिनेत्रीसोबत केलं काम

रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन करत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 11:35 AM IST

अक्षय कुमारने शेअर केला फोटो, तब्बल सहा वर्षांनंतर या अभिनेत्रीसोबत केलं काम

मुंबई, २२ एप्रिल- बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार 'केसरी' सिनेमाच्या यशानंतर आता 'सूर्यवंशी' सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र झाला आहे. या फोटोसोबत अक्षयने खुलासा केला की कतरिना कैफही आता या सिनेमाचा भाग असणार आहे. अक्षय आणि कतरिनाने आतापर्यंत ‘हमको दिवाना कर गये’, ‘सिंग इज किंग’, ‘नमस्ते लंडन’ आणि ‘दे दना दन’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. आतापर्यंत प्रेक्षकांना दोघांची केमिस्ट्री आवडली असून आता आगामी सिनेमांमध्येही ही हिट जोडी प्रेक्षकांना दिसणार आहे. सिनेसृष्टीत कतरिनाची जोडी जेवढी सलमान खानसोबत हिट आहे तेवढीच पसंती अक्षय- कतरिनाच्या जोडीलाही आहे.
 

Loading...

View this post on Instagram
 

Super excited to join the team of sooryavanshi with the incredible @itsrohitshetty for the first time , cant wait to be back on set with @akshaykumar after soooooo long 🌝 and the inimitable @karanjohar @reliance.entertainment @rohitshettypicturez @dharmamovies #CapeOfGoodFilms


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

आलिया- रणबीरला एकत्र फिरताना पाहून युजर्स म्हणाले, 'आलिया नाराज दिसतेय'

VIDEO- गच्चीवर विक्रांतला किस करताना दिसली दीपिका पदुकोण, ‘छपाक’चा सीन व्हायरल

या पाच सिनेमांमुळे अमिताभ बच्चन झाले 'महानायक'

आता कतरिना 'सूर्यवंशी' सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत दिसणार की तिची आणखी वेगळी भूमिका दिसेल याचा खुलासा अजून झालेला नाही. पण लवकरच तिच्या भूमिकेबद्दलही प्रेक्षकांना कळेल. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाची निर्मिती करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन करत आहे. कतरिना आणि अक्षयचा धर्मा प्रोडक्शनसोबतचा हा पहिला सिनेमा आहे. तर रोहित आणि करणचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी दोघांनी 'सिंबा' सिनेमासाठी एकत्र काम केलं होतं.

कतरिनाच्या आगामी सिनेमाला सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती सलमान खानसोबत 'भारत' सिनेमात दिसणार आहे.अली अब्बास जफरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून दिशा पाटनी, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर आणि नोरा फतेही अशी तगडी स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळेल. या वर्षी ईदला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 11:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...