मुंबई, 26 नोव्हेंबर- बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif), ईशान खट्टर (Ishan Khattar) आणि सिद्धांत चतुर्वेदी (Sidhant Chaturvedi) यांच्या 'फोन भूत' (Phone Bhoot) या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. गेल्या वर्षी या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते. आता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नव्हती. आज अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तिन्ही स्टार्सच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. त्याचवेळी लग्नाच्या चर्चेदरम्यान कतरिना कैफने चाहत्यांना खास भेट दिली आहे.
KATRINA KAIF - ISHAAN - SIDDHANT CHATURVEDI: 'PHONE BHOOT' RELEASE DATE FINALISED... #PhoneBhoot - starring #KatrinaKaif, #Ishaan and #SiddhantChaturvedi - to release on 15 July 2022... Directed by #GurmmeetSingh... Produced by #RiteshSidhwani and #FarhanAkhtar. pic.twitter.com/eQKEsEM7xG
— taran adarsh (@taran_adarsh) November 26, 2021
चित्रपटाची स्टारकास्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता कायम आहे. 'फोन भूत' पुढच्या वर्षी १५ जुलैला रिलीज होणार आहे. 'फोन भूत' हा रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंटचा तिसरा चित्रपट आहे. याआधी 'तुफान' आणि 'गली बॉय' हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या आगामी चित्रपटात ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत.
समीक्षकांनीही एक्सेल एंटरटेनमेंटचे चित्रपट गेल्या काही वर्षांत खूप पसंत केले आहेत. आणि हे चित्रपट व्यावसायिक हिटही झाले आहेत. फोन भूत हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाचा अभिनेता ईशान खट्टर धडक, खाली पीली, , एक सुटेबल बॉय या चित्रपटात दिसला आहे. या चित्रपटांतून त्याची खूप प्रशंसा झाली होती. त्याचवेळी सिद्धांत चतुर्वेदी 'गली बॉय' आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली 2' या चित्रपटातही दिसला आहे. तो एक अतिशय आश्वासक अभिनेता मानला जातो.
(हे वाचा:83 Teaser Out: रणवीर सिंहच्या '83' चा टीजर अखेर रिलीज; चित्रपट पाहण्यासाठी..)
त्याचवेळी, कतरिना कैफला दोन फ्रेश चेहऱ्यांसह पाहणे मनोरंजक असेल. यासोबतच ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांना एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी लोक खूप एन्जॉय करणार आहेत. आता लोक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Katrina kaif