कतरिनाबाबत विधान केल्यानं हृतिक रोशन चर्चेत; म्हणाला, ती फक्त दिसायला हॉट आणि सुंदर...

हृतिकनं वॉरच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री कतरिना कैफबद्दल केलेल्या एका विधानामुळे तो खूपच चर्चेत आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 8, 2019 01:04 PM IST

कतरिनाबाबत विधान केल्यानं हृतिक रोशन चर्चेत; म्हणाला, ती फक्त दिसायला हॉट आणि सुंदर...

मुंबई, 08 सप्टेंबर : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन सध्या त्याचा आगामी सिनेमा वॉरच्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. मात्र सध्या तो एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे. हृतिकनं वॉरच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री कतरिना कैफबद्दल केलेल्या एका विधानामुळे तो खूपच चर्चेत आला आहे. त्याचं हे विधान सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. वॉर सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी हृतिक रोशननं कतरिना कैफला ‘मजूर’ म्हटलं आहे. यावेळी हे दोघंही सिंगापूरमध्ये एकत्र उपस्थित होते.

मीडिया रिपोर्टनुसार हृतिक म्हणाला, ‘कतरिना कैफ फक्त दिसायला हॉट आणि सुंदर नाही तर ती आतून खूप मजबूत आहे. मी तिचा सन्मान करतो. कारण ती खूप मेहनती आहे. मी असं म्हटल्यानं ती नाराज सुद्धा होते मात्र ती एवढी मेहनत करते की, तिच्यासोबत काम करताना मला जास्त मेहनत करावी लागत नाही.’ हृतिकची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Birthday Special : 'त्या' निर्णयामुळे आशा भोसले लता दीदींपासून होत्या दुरावल्या

हृतिक रोशनचा वॉर हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात हृतिक सोबत टायगर श्रॉफचीही महत्त्वाची भूमिका आहे. तर वाणी कपूर सुद्धा हृतिक आणि टायगर सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तर कतरिना सुद्धा तिच्या आगामी सिनेमांच्या शूटिंगमध्ये बीझी आहे. ती अक्षय कुमार सोबत सूर्यवंशम या सिनेमात दिसणार आहे. हृतिक आणि कतरिनानं ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ आणि ‘बँग बँग’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची वाहवा मिळाली. याशिवाय हे दोघंही खूप चांगले डान्सर सुद्धा आहेत.

Loading...

अण्णांच्या 'या' एका निर्णयानं घरातल्यांना बसतो जबरदस्त धक्का

==========================================================

असे असतील मुंबईतील 3 नवीन मेट्रो मार्ग, पाहा SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...