Home /News /entertainment /

कतरिना कैफला आवडला दीर सनी कौशलचा LOOK! अभिनेत्रीने कमेंट करत म्हटलं...

कतरिना कैफला आवडला दीर सनी कौशलचा LOOK! अभिनेत्रीने कमेंट करत म्हटलं...

अभिनेत्री कतरिना कैफने विकीचा लहान भाऊ (Vicky Kaushal Brother) सनी कौशलच्या (Sunny Kaushal) पोस्टवर कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

  मुंबई, 4 जानेवारी-   गेल्या महिन्यात म्हणजेच 9 डिसेंबरला कतरिना कैफ  (Katrina Kaif)  आणि विकी कौशल  (Vicky Kaushal)  यांनी लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या प्रचंड चर्चा झाल्या. लग्नानंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत या जोडप्याने आपल्या नवीन प्रवासाची माहिती दिली होती. त्यांनतर आता विकी आणि कतरिना एकमेकांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या पोस्टवरसुद्धा कमेंट्स द्यायला लागले आहेत. नुकताच अभिनेत्री कतरिना कैफने विकीचा लहान भाऊ   (Vicky Kaushal Brother)  सनी कौशलच्या   (Sunny Kaushal)  पोस्टवर कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
  अभिनेता सनी कौशलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतंच काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो राजेशाही थाटात दिसून येत आहे. यामध्ये सनीने काळ्या रंगाचा पारंपरिक कुर्ता अन पायजमा परिधान केला आहे. यामध्ये तो अगदी रॉयल दिसत आहे. हे फोटो शेअर करत सनीने लिहिलं आहे, 'राजासारखं पोज द्या आणि योद्धासारखं दिसा'. सध्या हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड पसंत केले जात आहेत. चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करून सनीचं कौतुक करत आहेत. यामध्ये एका कमेंटने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. आणि ते म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफची कमेंट. विकी आणि कतरिनाचं लग्न झाल्यानंतर कतरिना आता सनीची वहिनी बनली आहे. सनीने एका इन्स्टा पोस्टमध्ये कतरिनाला 'परजाई' असं म्हटलं होतं. वहिनीला पंजाबी भाषेत परजाई म्हटलं जातं. त्यांनतर आता कतरिनानं आपल्या धाकट्या दीराच्या फोटोंवर खास अंदाजात कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. कतरिनाने सनीच्या फोटोंवे कमेंट करत लिहिलं आहे, 'वाईब आहे.. वाईब आहे'. आता कतरिनाच्या या कमेंटवर युजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. (हे वाचा:महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात विकी कौशलच्या भावाला करतेय डेट ... ) अभिनेता आणि विकीचा भाऊ सनी कौशल सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या पोस्ट फारच इंटरेस्टिंग असतात. चाहते नेहमीच त्याच्या प्रत्येक पोस्टचं कौतुक करत असतात. नुकताच सनी कौशल अभिनेत्री राधिका मदानसोबत 'शिद्दत' या चित्रपटात झळकला होता. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना फारच पसंत पडली होती. परंतु रियाल लाईफमध्ये सनीच्या लव्हलाईफची मोठी चर्चा सुरु आहे. सनी कौशल आणि मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. ते दोघे सतत एकेमकांसोबत वेळ घालवताना दिसून येतात. शर्वरी कतरिना आणि विकीच्या लग्नात त्यांच्या कुटुंबाच्या फारच जवळ दिसून आली. परंतु अभिनेत्रीने आपण फक्त एक चांगले मित्र असल्याचं म्हटलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या