Home /News /entertainment /

कतरिना कैफने लग्नासाठी विकी समोर ठेवली होती 'ही' अट; अभिनेत्यानं असं पूर्ण केलं वचन

कतरिना कैफने लग्नासाठी विकी समोर ठेवली होती 'ही' अट; अभिनेत्यानं असं पूर्ण केलं वचन

विकी कौशल आणि कतरिना कैफ (Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding) यांनी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे लग्न केलं आहे. लग्नानंतर कतरिना-विकी आपल्या लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

पुढे वाचा ...
  मुंबई,14  डिसेंबर-   विकी कौशल आणि कतरिना कैफ    (Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding)   यांनी ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे लग्न केलं आहे. लग्नानंतर कतरिना-विकी आपल्या लग्नातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत. पण कतरिनाला लग्नासाठी पटवणे विकी कौशलसाठी खूप अवघड होते.कतरिनाच्या एका फ्रेंडने सांगितले कि, अभिनेत्रीने लग्नाआधी विकीसमोर एल अट ठेवली होती. ती अट मान्य केल्यानंतर कतरिनाने लग्नाला होकार दिला होता. कतरिना कैफच्या एका फ्रेंडने पत्रकार सुभाष के झा यांना सांगितले की, “हे सर्व अचानक घडले… त्यांची भेट, लव्हस्टोरी, आणि लग्न. विकी कौशलने त्यांच्या दोन महिन्यांच्या रिलेशनशिपमध्ये ठरवले की कतरिना ही एकमेव मुलगी आहे जिच्यासोबत त्याला आयुष्य घालवायचे आहे.कतरिनाला या सर्वांची अजिबात कल्पना नव्हती. तिच्या आधीच्या ब्रेकअपमधून ती अजूनही बाहेर पडली नव्हती. तिला विकी पसंत पडला होता. पण तिला थोडा वेळ हवा होता. कतरिना कैफच्या फ्रेंडने सांगितले की, "कतरिनाने लग्नाला हो म्हणेपर्यंत विकीने तिची पाठ नाही सोडली. त्यानंतर कतरिनाने लग्नापूर्वी एक अट ठेवली. विकी कतरिनाला जो आदर जे प्रेम देतो तेच प्रेम आणि आदर तिचं कुटुंब, तिची आई आणि भावंडांना द्यायला हवा. अशी ही अट होती. त्त्यांनंतर विकी तिच्या कुटुंबासोबत तिच्या बहीण-भावासोबत जशी धम्माल-मस्ती करत होता जो आदर त्यांना देत होता. ते पाहून कतरिनाला खूप आनंद झाल्याचा तिच्या फ्रेंडने केला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

  दरम्यान कतरिना कैफने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नातील काही खास फोटो शेअर केले होते. यामध्ये तिच्या बहिणी तिला लग्नाच्या मंडपात घेऊन जाताना दिसत आहेत. यावेळी कतरिनाच्या डोक्यावर तिच्या बहिणींनी सुंदर फुलांची चादर धरली आहे. तसेच त्यांनी सुंदर अशा पेस्टल कलरचे लेहंगे घातले होते. कतरिनासोबतच तिच्या बहिणीसुद्धा फारच सुंदर दिसत होत्या. कतरिनाने फोटो शेअर करत बहिणींसाठी एक खास पोस्टही लिहिली होती. शिवाय तिने आपल्या बहिणींना आपली ताकत म्हटलं आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

  पुढील बातम्या