मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लग्नानंतर कतरीना जाणार सलमानसोबत; तर विकी कौशल काय करणार? असा आहे प्लॅन

लग्नानंतर कतरीना जाणार सलमानसोबत; तर विकी कौशल काय करणार? असा आहे प्लॅन

सध्या बॉलिवूडमध्ये कतरीना कैफ  (Katrina Kaif)  आणि विकी कौशल (Vicky Kaushan) यांच्या लग्नाचीच चर्चा सुरू आहे. या दोघांच्या लग्नाबाबत (Katrina Kaif marriage)  किती तरी बातम्या दररोज पाहायला मिळत आहेत. दोन्ही कुटुंबीय सध्या मोठ्या प्रमाणात लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत.

पुढे वाचा ...

  मुंबई,26 नोव्हेंबर-  सध्या बॉलिवूडमध्ये कतरीना कैफ   (Katrina Kaif)   आणि विकी कौशल  (Vicky Kaushan)  यांच्या लग्नाचीच चर्चा सुरू आहे. या दोघांच्या लग्नाबाबत  (Katrina Kaif marriage)   किती तरी बातम्या दररोज पाहायला मिळत आहेत. दोन्ही कुटुंबीय सध्या मोठ्या प्रमाणात लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कतरीना आणि विकी (Katrina and Vicky) राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत. लग्नासाठी राजस्थानला जाण्यापूर्वी ते मुंबईमध्येच कोर्ट मॅरेज करतील. लग्नाच्या तयारीसोबतच हे दोघे आपापल्या कामामध्येही व्यग्र आहेत. दोघेही पुढचे काही महिने अगदीच बिझी असणार आहेत.

  लग्नानंतर कतरीना सलमानसोबत जाणार शूटींगवर-

  कतरीना आता ‘टायगर 3’ या चित्रपटात सलमान खानसोबत  (Salman Khan)  दिसणार आहे. या सिनेमाचं  (Tiger 3 movie)  शूटिंग लवकरच सुरू होणार असून, लग्नानंतर कतरीना थेट तिकडेच जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. टायगर 3 हा सलमानच्या ‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांचा पुढचा भाग आहे. याच्या पहिल्या दोन्ही भागांमध्ये सलमानसोबत कतरीनाच होती.

  विकी कौशल जाणार मध्य प्रदेशला-

  दुसरीकडे विकी कौशल लग्नानंतर मध्य प्रदेशला रवाना होईल. तो कोणत्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी (Vicky Kaushal upcoming films) मध्य प्रदेशला जाणार आहे याबाबत माहिती मिळू शकली नाही. खरं तर विकी कौशलकडे सध्या चित्रपटांची रांग लागली आहे. लग्नाच्या आधीदेखील तो कामातच बिझी असणार आहे. तसंच, लग्नानंतरही त्याला लगेच चित्रपटांच्या शूटिंगला जावं लागणार आहे.

  सध्या विकी एका रोमान्स कॉमेडी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात विकीसोबत सारा अली खान (Vicky Kaushal and Sara Ali Khan) दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग रखडू नये यासाठी लग्नाआधीच्या डेट्स विकीने दिल्या आहेत. तीन डिसेंबरपर्यंत तो या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असणार आहे.

  (हे वाचा:'काटे नही कटते' वर नोरा-टेरेन्सचा जबरदस्त डान्स; बोल्ड VIDEOने सोशल मीडियावर....)

  लग्नात येणाऱ्यांच्या मोबाइलवर बंदी

  दरम्यान, या दोघांच्याही लग्नाची तयारी अगदी जोरात सुरू आहे. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला या तयारीची जबाबदारी देण्यात आली आहे. माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांच्या लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना मोबाइल आतमध्ये नेण्यास मनाई करण्यात येणार आहे. या दोघांनाही त्यांच्या परवानगीशिवाय लग्नाचे फोटो ऑनलाइन लीक व्हायला नको आहेत. यामुळे ही खबरदारी घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.या दोघांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली, तरी येत्या काही आठवड्यांमध्येच हे स्टार कपल लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

  First published:

  Tags: Katrina kaif, Vicky kaushal