Home /News /entertainment /

कतरिना कैफच्या हातावर असा चढलाय विकीच्या प्रेमाचा रंग! अभिनेत्रीने शेअर केला मेहंदी Pic

कतरिना कैफच्या हातावर असा चढलाय विकीच्या प्रेमाचा रंग! अभिनेत्रीने शेअर केला मेहंदी Pic

कतरिना कैफ (Katrina Kaif) आता मिसेस विकी कौशल (Vicky Kaushal) बनली आहे. 9 डिसेंबर रोजी दोघेही लग्नाच्याबेडीत अडकले आहेत. दोघांनी या शाही लग्नाचे अनेक फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

    मुंबई,19 डिसेंबर-   कतरिना कैफ   (Katrina Kaif)  आता मिसेस विकी कौशल   (Vicky Kaushal)  बनली आहे. 9 डिसेंबर रोजी दोघेही लग्नाच्याबेडीत अडकले आहेत. दोघांनी या शाही लग्नाचे अनेक फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु लग्नाच्या ९ दिवसांनंतर मध्यरात्री कतरिनाने एक खास फोटो शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  ज्यामध्ये ती तिच्या सुंदर मेहंदीचा  (Katrina Kaif Mehandi)   रंग दाखवत आहे. कतरिनाने अगदी प्रेमाने विकीचं नाव आपल्या हातांवर काढून घेतलं आहे. कतरिना कैफ लग्नानंतरचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिनं मेहंदीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये कतरिनानं हातात मेहंदी काढली आहे.अभिनेत्री आता पंजाबी घरची सून झाली आहे. त्यामुळे तिच्या हातात पारंपरिक लाल बांगड्याही घातल्या आहेत. हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करताना कॅप्शनमध्ये कतरिनाने हार्ट इमोजी बनवला आहे.कतरिनानं हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर लोक तिच्या हातात पती विकी कौशलचं नाव शोधू लागले आहेत. कतरिना कैफनं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. चाहते या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत. तसेच कतरिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये बॅकग्राउंडला निळाशार समुद्र दिसत आहे. त्यामुळे चाहते असा अंदाज लावत आहेत की, हा फोटो विकी आणि कतरिनाच्या हनिमूनचा आहे. कारण लग्नानंतर लगेच दोघेही मालदीवला गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र त्यांनतर दोनच दिवसात ते मुंबईला परतले होते. (हे वाचा:'Kabhi Khushi Kabhie Gham'मध्ये साकारली होती छोटी करिना; आज 'ती' चिमुकली दिसते..) कतरिनाच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहते सतत कमेंट करत आहेत. आणि आयुष्याच्या नव्या इनिंगसाठी तिला शुभेच्छा देत आहेत.लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कतरिना आणि विकी हेलिकॉप्टरनं हनीमूनला निघाले होते. कुठे गेले होते याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. परंतु दोघांनी मालदीवमध्ये एक छोटा रोमँटिक हनीमून एन्जॉय केल्याचं वृत्त आहे. काही दिवसांनंतर, दोघेही नवविवाहित जोडप्याच्या रूपात मुंबईच्या कलिना एयरपोर्टवर दिसून आले होते. हातावर याठिकाणी लिहिलं विकीचं नाव- कतरिनाने एका खास ठिकाणी विकी कौशलचं नाव तिच्या हातावर लिहिलं आहे. तिनं फिंगर रिंगवर विकी कौशलचं नाव लिहिलं आहे. फोटो झूम केल्यानंतर ते स्पष्टपणे दिसतं.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या