मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /लग्नानंतर Katrina Kaifने Insta प्रोफाइलमध्ये केला मोठा बदल, लवकरच बदलणार नाव?

लग्नानंतर Katrina Kaifने Insta प्रोफाइलमध्ये केला मोठा बदल, लवकरच बदलणार नाव?

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे (Katrina-Vicky Wedding) लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर या जोडप्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कतरिना आणि विकी लग्नानंतर मुंबाला परतले आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे (Katrina-Vicky Wedding) लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर या जोडप्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कतरिना आणि विकी लग्नानंतर मुंबाला परतले आहेत.

कतरिना कैफ आणि विकी कौशलचे (Katrina-Vicky Wedding) लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर या जोडप्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कतरिना आणि विकी लग्नानंतर मुंबाला परतले आहेत.

मुंबई, 16 डिसेंबर- कतरिना कैफ आणि विकी कौशलचे (Katrina-Vicky Wedding) लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर या जोडप्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे. कतरिना आणि विकी लग्नानंतर मुंबाला परतले आहेत. मुंबईत परतल्यानंतर आता कतरिना कैफ तिच्या नवीन घरात स्थायिक झाली आहे. त्याचवेळी दोघंही आपली नवीन भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपलं नातं खाजगी ठेवणाऱ्या कतरिना कैफने आता पती विकी कौशलसोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

कतरिनाने बदलला प्रोफाइल फोटो

कतरिना कैफने तिचा इन्स्टा प्रोफाइलमध्ये मोठा बदल केला आहे. तिनं तिचा एकटीचा फोटो हटवून विकी कौशलसोबतचा लग्नाचा फोटो लावला आहे. आता कतरिनाचा हा लग्नाचा फोटो तिचा नवीन प्रोफाईल पिक्चर बनला आहे. हा नवा बदल पाहून चाहते खूप खूश आहेत. इतकेच नाही तर कतरिना कैफ लवकरच प्रोफाईलवरील तिचे नाव बदलू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

वाचा-विकी कौशलमुळं सारा अली खाननं स्वतः ला म्हटलं नशीबवान! काय आहे कारण?

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह 9 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये झाला होता. दोघांच्या लग्नाचे सेलिब्रेशन 7 ते 9 डिसेंबरपर्यंत चालले. या लग्नात कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. लग्नानंतर कतरिना आणि विकी फोटो शेअर करण्यात मग्न आहेत. दोघांचा आनंद पाहून चाहतेही खूप खुश आहेत. लवकरच हे कपल मुंबईत त्यांच्या इंडस्ट्रीतील मित्रांसाठी रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहे.या दोघांच्या एका जवळच्या मित्राने बॉलिवूड लाईफला दिलेल्या मुलाखतीनुसार, कतरिना आणि विकी लवकरच बॉलिवूडला ग्रँड रिस्पेशन पार्टी (Vicky Kaushal Katrina Kaif Reception) देणार आहेत.

वाचा-राखीने-शमिताला चक्क 'ब्रा'मध्ये वस्तू लपवण्याचा दिला सल्ला, मग झालं असं...

हे दोघेही येत्या २० डिसेंबरला ही रिसेप्शन पार्टी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच हे दोघेही इतक्या घाईत मालदीवहुन परतल्याच म्हटलं जात आहे. कतरिना आणि विकीने मुंबईपासून दूर राजस्थानमध्ये कुटुंब आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा ऊरकला होता. त्यामुळे आता हे दोघेही सर्वांना आपल्या रिसेप्शन पार्टीमध्ये आमंत्रित करणार आहेत. असंही म्हटलं जात आहे.

तसेच ख्रिसमस जवळ येत आहे. आणि या नवविवाहित जोडप्याचा लग्नानंतर हा पहिलाच सण आहे. त्यामुळे हे दोघेही रिसेप्शन आधी करून घ्यायचा विचार करत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, विकी कतरिनाच्या रिसेप्शन पार्टीसाठी अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि रणबीर कपूर यांसारख्या सर्व मोठ्या कलाकारांना निमंत्रण देण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर विकी कौशल-कतरिना कैफच्या रिसेप्शन पार्टीत हृतिक रोशन, करण जोहर, अक्षय कुमार, कंगना रणौत, आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, अजय देवगण, ईशान खट्टर, मेघना गुलजार, रोहित शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, तापसी पन्नू आणि अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलीवूड कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal