मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ट्रॅफिक पोलिसाने अडवली कतरिना कैफची गाडी; मग असं काही झालं....Video

ट्रॅफिक पोलिसाने अडवली कतरिना कैफची गाडी; मग असं काही झालं....Video

कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif & Vicky Kaushal) यांच्या लग्नाची बी-टाऊनमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली आहे. लोक हे दोघे कधी यावर अधिकृत माहिती देणार याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई, 5 डिसेंबर- कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif & Vicky Kaushal) यांच्या लग्नाची बी-टाऊनमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली आहे. लोक हे दोघे कधी यावर अधिकृत (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding)माहिती देणार याची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. मात्र कतरिना आणि विकी यांना याची काही पडलेले नाही. कारण दोघेही मुंबईत अगदी नेहमीप्रमाणे जिममध्ये जाताना दिसत आहेत. बहुतेक दोघांनाही त्यांच्या लग्नाची थोडीशीही माहिती बाहेर जाऊ द्यायची नाही, असे दिसते. पण पापाराझीही काही कमी नाहीत. दोन्ही स्टार्सच्या प्रत्येक पावलावर ते लक्ष ठेवून आहेत. अशा परिस्थितीत कतरिनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात तिची कार ट्रॅफिक पोलीस थांबवताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणत व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक ट्रॅफिक पोलीस कतरिनाची कार थांबवतो, नंतर तपासण्यासाठी पुढे जातो. ड्रायव्हरच्या सीटजवळ येऊन तो खिडकीतून आत डोकावतो नंतर ड्रायव्हरशी बोलतो आणि त्यांना पुढे जाऊ देतो. व्हिडिओमध्ये काही खास नाही, पण कॅटरिनाच्या लग्नाच्या चर्चेदरम्यान वाहतूक पोलिसांचे हे काम पाहून लोक खूप एन्जॉय करत आहेत. वाचा : जॅकलिन फर्नांडिस श्रीलंकेतून भारतात कशी पोहोचली? अशी झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री! एका यूजरने लिहिले की, 'खरं तर त्याला कतरिनाला बघायचं होतं.' दुसऱ्याने लिहिले आहे की, 'मुंह दिखाई' झाली. आणखी एकाने , कतरिना आणि विकीच्या लग्नाची अधिकृत माहिती जाहीर करण्याची विनंती देखील केली. त्याने लिहिले आहे की, 'भाऊ, मला मुंबई पोलिसांना एक विनंती करायची आहे. एकदा तपासा, हे लोक लग्न करत आहेत ना? मला तर काहीसा गोंधल वाटतोय कारण एवढी सुरक्षा कोण ठेवते.' दुसर्‍याने लिहिले आहे की, 'लग्न कधी आहे हे विचारायला आलो होतो.' अशा अनेक मजेशीर कमेंट यूजर्सनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये लिहिल्या आहेत.
फॅनसोबत सेल्फी यापूर्वी, कतरिनाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये ती चाहत्यासोबत सेल्फी घेताना दिसली होती. चाहत्यांच्या विनंतीवरून कतरिनाने चाहत्यासोबत सेल्फी काढला. तिचा हा नम्र स्वभाव लोकांना आवडला आहे. एका यूजरने तर तिच्या कौतुकात 'सुंदर मनाची वधू' असे लिहिले आहे.
First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

पुढील बातम्या