कतरिना कैफ अडकली लग्नाच्या बेडीत? नवरीच्या गेटअपमधील फोटो झाले VIRAL

कतरिना कैफ अडकली लग्नाच्या बेडीत? नवरीच्या गेटअपमधील फोटो झाले VIRAL

मागच्या काही काळापासून कतरिना कैफ अभिनेता विकी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

  • Share this:

मुंबई, 24 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. कधी तिचा सिनेमा, कधी फोटोशूट तर कधी तिच्या लिंकअपच्या चर्चा. मागच्या काही काळापासून कतरिना कैफ अभिनेता विकी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मध्यंतरीच्या काळात या दोघांचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता कतरिना नवरीच्या गेटअपमधील फोटो व्हायरल झाल्यानं सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

कतरिना कैफचे नवरीच्या गेटअपमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये ती पिंक कलरचा डिझायनर लेहंगा आणि हेवी ज्वेलरीमध्ये सजलेली दिसत आहे. विशेष म्हणजे हे फोटो कतरिनानं स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून तिनं लग्न केलं की काय अशी चर्चा सुरू होती मात्र असं काहीही नाही आहे.

तारा सुतारियाच्या BIKINI लुकवर चाहते घायाळ, मालदीव व्हेकेशनचे फोटो VIRAL

View this post on Instagram

on set shenanigans .....

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो कतरिनाच्या आगामी सिनेमाच्या सेटवरील आहेत. याठिकाणी कतरिनासोबत तिची स्टायलिस्ट अनाइता श्रॉफ, हेअरस्टायलिस्ट इयानी आणि मेकअप आर्टिस्ट डेनियन हे सुद्धा दिसत आहेत. हे सर्वजण कार्ड्स खेळताना दिसत आहे. कतरिना सुद्धा या सर्वांसोबत खूप एन्जॉय करताना दिसत आहे. तिच्या या फोटोंवर आतापर्यंत 4 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. ज्यात बॉलिवूड सेलिब्रेटींसोबतच अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लाइकचा समावेश आहे.

'मी स्मोकर, अल्कोहोलिक होतो...' ज्येष्ठ अभिनेत्यानं उलगडलं पडद्यामागचं आयुष्य

कतरिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती शेवटची सलमान खानच्या ‘भारत’ सिनेमात दिसली होती. या सिनेमातील तिचा कर्ली हेअरवाला लुक आणि तिच्या अभिनयाचं खूप कौतुकही झालं होतं. यानंतर ती लवकरच अक्षय कुमार सोबत सूर्यवंशीमध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अक्षय-कतरिना ही जोडी जवळपास 10 वर्षांनी एकत्र येणार आहे. हा एक कॉप सिनेमा असून या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. येत्या 27 मार्चला हा सिनेमा रिलीज होत आहे.

पूजा बेदीच्या दुसऱ्या लग्नावर मुलगी आलियानं दिली प्रतिक्रिया

First published: January 24, 2020, 8:50 AM IST

ताज्या बातम्या