...जर ते फोटो काढले नसते, तर कतरिना असती कपूर घराण्याची सून!

हे फोटो कोणी आणि कधी काढले याची काहीच माहिती मिळाली नाही मात्र कतरिनाच्या बेजबाबदारपणामुळे हे फोटो व्हायरल झाल्याचं बोललं जातं.

  • Share this:

अभिनेत्री कतरिना कैफ आज तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणाऱ्या कतरिनाला या ठिकाणी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली.

याशिवाय ती सर्वाधिक चर्चेत राहीली होती ते रणबीर कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनानं तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठिण काळ होता असं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

कतरिना आणि रणबीर त्यांच्या नात्यात खूप पुढे निघून गेले होते. रणबीर तर आपल्या आई-बाबांना सोडून कतरिनासोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. तसेच या दोघांनीही आपापल्या कुटुंबीयांकडून या नात्याची परवानगीही घेतली होती.

रणबीरच्या लाइफमधील कोणत्याही मुलीच्या बाबतीत नीतू कपूर यांच्या परवानगीशिवाय हे नातं पुढे जात नाही असं म्हटलं जातं. दीपिकाच्या बाबतीत नीतू रणबीरच्या बाजूनं नव्हत्या मात्र कतरिनासाठी बऱ्याच काळानं त्यांनी होकार दिला होता.

कतरिना तर कपूर फॅमिलीमध्ये एवढी मिसळली होती की, ती अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांत किंवा सेलिब्रेशनला रणबीरच्या फॅमिलीसोबत दिसत असे. तसेच कॉफी विथ करण मध्ये करिनानं सुद्धा कतरिना आपल्याला वहिनी म्हणून पसंत असल्याचं सांगितलं होतं.

यानंतर पहिल्यांदाच सलमान कोणत्याच गर्लफ्रेंडविषयी एवढ्या मोकळेपणानं बोलला नव्हता जेवढं तो कतरिना बद्दल बोलला. त्यानं बहीण अर्पिताच्या लग्नात मी कतरिनाला कतरिना कैफ-खान बनण्याची संधी दिली होती मात्र तिला कतरिना कैफ-कपूर बनायचं आहे असं म्हटलं होतं.

कतरिना आणि रणबीरमध्ये ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमाच्या वेळी जवळीक वाढली होती. त्यानंतर त्यांचं रिलेशन जवळपास 4 वर्ष टिकलं 2013 मध्ये स्पेनच्या बीचवरील कतरिना आणि रणबीरच्या व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले. ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला.

हे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण कपूर घराणं कतरिनाच्या विरोधात उभं राहिलं. त्यानंतर कतरिनानं खासगी फोटो छापल्या प्रकरणी बॉम्बे टाइम्स आणि अन्य काही वृत्तपत्रांना कायदेशीर नोटीस पाठवली.

हे फोटो कोणी आणि कधी काढले याची काहीच माहिती मिळाली नाही मात्र कतरिनाच्या बेजबाबदारपणामुळे हे फोटो व्हायरल झाल्याचं बोललं जातं. जर हे फोटो काढले गेले नसते किंवा व्हायरल झाले नसते तर कदाचित कतरिना आता कपूर घराण्याची सून असती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 10:44 AM IST

ताज्या बातम्या