मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Katrina Kaif आणि Vicky Kaushal च्या लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम आला समोर;जाणून घ्या कधी काय होणार

Katrina Kaif आणि Vicky Kaushal च्या लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम आला समोर;जाणून घ्या कधी काय होणार

कतरिना कैफ   (Katrina Kaif)  आणि विकी कौशल   (Vicky Kaushal)   यांच्या लग्नसोहळ्याची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. वधू-वर आणि इतर पाहुणे बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. आज रात्री एक मैफिल होईल.

  • Published by:  Aiman Desai

 मुंबई, 7 डिसेंबर-   कतरिना कैफ   (Katrina Kaif)  आणि विकी कौशल   (Vicky Kaushal)   यांच्या लग्नसोहळ्याची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. वधू-वर आणि इतर पाहुणे बरवाडा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचले आहेत. आज रात्री एक मैफिल होईल. त्यानंतर अखंड विवाहाचे कार्यक्रम होतील. ९ डिसेंबरला दुपारी विकी कौशल वर आणि कतरिना कैफ वधू बनेल. लग्न समारंभाशी संबंधित जवळपास सर्वच कार्यक्रम आता समोर आले आहेत.

असा असेल कार्यक्रमाचा वेळापत्रक-

रिपोर्टनुसार आज रात्री संगीत सोहळा होणार आहे. त्यानंतर बुधवारी सकाळी 11 वाजता हळदीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. त्यानंतर मेहंदी लावण्याचा विधी पार पडेल. या आधी 8 ते 10 च्या दरम्यान नाश्ता होईल. रात्रीच्या जेवणानंतर रात्रीची पार्टी होईल. गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता फेऱ्यांचा विधी सुरू होईल. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत लग्नसोहळ्याची पार्टी चालणार आहे. यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

सोमवारी रात्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल जयपूर विमानतळावर पोहोचले. नंतर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ते सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ का बरवारा शहरात पोहोचले. लग्नाच्या जोडप्याचा ताफा तीन आलिशान कारमधून रात्री ११.१० वाजता चौथ का बरवारा शहरातील सिक्स सेन्स बारवारा फोर्ट हॉटेलमध्ये पोहोचला. तेथे हॉटेल व्यवस्थापनाने त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दोघांचेही फुलांचे हार घालून आणि तिलक लावून स्वागत करण्यात आले. आता दोन दिवस कतरिना कैफ आणि विकी कौशलसोबत लग्नसोहळ्याचे कार्यक्रम होणार आहेत.

उल्लेखनीय आहे की कतरिना कैफ आणि विकी कौशलचा विवाह राजशाही थाटामाटात सिक्स सेन्सेस बरवारा फोर्ट हॉटेलमध्ये होणार आहे. हा विवाह सोहळा पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या विवाह सोहळ्याबाबत जिल्हा प्रशासनही सतर्क आहे.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal