Home /News /entertainment /

कतरिना- विकीला लग्नाच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, समंथा होतेय ट्रोल

कतरिना- विकीला लग्नाच्या शुभेच्छा देणं पडलं महागात, समंथा होतेय ट्रोल

कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर झुंबड उडाली आहे.

    मुंबई, 9 डिसेंबर - Katrina Kaif Vicky Kaushal Wedding: कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे लग्नबंधनात अडकले आहेत. आज राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या चौथ का बरवडामध्ये या जोडप्याने एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले आहे. लग्नानंतर या कपलचे पहिले फोटो समोर आले आहेत. लाल रंगाच्या पेअरमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न अनेक अर्थाने खास होते. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तयारी अगदी गुप्त ठेवली होती. मात्र या दोघांना शुभेच्छा देणं  समंथाला महाग (Samantha Ruth Prabhu)  पडलं आहे. कतरिना आणि विकीने   इन्स्टावर लग्नाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. पहिल्या पाच मिनिटाताच कतिरानाने शेअर केलेल्या फोटोंना चार लाख लाईक्स मिळाल्या आहेत. कमेंटचा तर धुळा उसळला आहे. विकीने शेअर केलेल्या फोटोंना देखील काही मिनिटात एका लाखाऊन आधिक लाईक्स मिळाल्या आहेत. चाहत्यांपासून ते सेलेब्स पर्यत  सर्वांनी या जोड्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कमेंट बॉक्स फक्त हार्टच्या इमोजीने भरून गेला आहे. अभिनेत्री समंथाने देखील या रॉयल कपलला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र तिला या शुभेच्छा महागात पडल्या आहेत. कारण नेटकऱ्यांनी तिला ट्रोल  (Samantha Troll)  करणयास सुरूवात केली आहे. संमथाचा नुकताच घटस्फोट झाला आहे. यावरूनच तिला ट्रोल करण्यात आलं आहे. एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, तू  तर सल्ला देऊन नको, नाहीतर यांनाचा पण घटस्फोट होईल.  काहींना या नेटकऱ्याच्या कमेंटला लाईक देखील केले आहे. कतरिना कैफने लाल रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला आहे. केसात गजरा, हातात बांगड्या, नथ, मांग-टिकासह मेकअपमध्ये कतरिना छान दिसत आहे. या ब्रायडल लुकमध्ये सर्व काही खास आहे. वधू-वर बनलेल्या कतरिना-विकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये विकी हॅण्डसम दिसत होता. या जोडीची पहिली झलक पाहायला मिळाल्याने चाहते खूपच खूश आहेत. वाचा : कतरिना-विकिच्या लग्नाची झलक पाहण्यासाठी सोशल मीडियावर झुंबड, अवघ्या 20 मिनिटात फोटोंना मिळाल्या 15 लाख लाईक्स राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरबडा येथे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी शाही पद्धतीने लग्न केले. सात फेरे घेऊन या जोडप्याने एकमेकांचा कायमचा हात हातात घेतला आहे.कतरिनाच्या रॉयल वेडिंगने चाहत्यांच्या मनात घर केले आहे आणि जेव्हा जेव्हा बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या आणि भव्य विवाहसोहळ्यांचा  नाव निघेल तेव्हा सर्वात आधी कतरिना-विकीच्या लग्नाची आठवण होईल असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal

    पुढील बातम्या