विकी कौशल-कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये? डिनर डेटचे PHOTO VIRAL

विकी कौशल-कतरिना कैफ रिलेशनशिपमध्ये? डिनर डेटचे PHOTO VIRAL

याआधी दिवाळी पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात हे दोघं एकत्र दिसले होते.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या आयुष्यात व्हायरल झालेल्या फोटोंचं खूप महत्त्व आहे. काही वर्षांपूर्वी बूम सिनेमाच्या सेटवरुन व्हायरल झालेल्या फोटोंनी कतरिनाचं आयुष्य पूर्णपणे बदलवून टाकलं. रणबीर कपूरसोबत तिचं नातं अगदी लग्नापर्यंत येऊन तुटलं. रणबीरसोबत बीचवर एंजॉय करतानाचे काही बिकिनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं त्यांचं हे नातं संपलं. त्यानंतर मागची काही वर्ष सिंगलच असलेल्या कतरिनाचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण यावेळी तिच्यासोबत दिसला तो सध्या हजारो तरुणांच्या गळ्यातला ताईत झालेला अभिनेता विकी कौशल दिसत आहे.

अभिनेत्री हरलीन सेठीशी ब्रेकअप झाल्यानंतर विकी कौशलचं नाव कतरिना कैफशी जोडलं जात आहे. किंबहुना कतरिनामुळेच विकी आणि हरलीनमध्ये दुरावा आल्याचंही बोललं जातं. दरम्यान नुकतेच विकी आणि कतरिना यांच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी दिवाळी पार्टीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात हे दोघं एकत्र दिसले होते. त्यानंतर आता व्हायरल झालेले हे फोटो बरंच काही सांगून जातात. सूत्रांच्या माहितीनुसार हे दोघंही मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये डिनर डेटसाठी गेले होते.

राखी सावंतच्या 'नकली पती'ला मेट्रोमध्ये महिलांनी बदडलं VIDEO व्हायरल

कतरिना-विकीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असले तरीही त्याच्याकडून मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तसेच या दोघांमध्ये काय चाललंय यावर ते काही बोललेले नाहीत त्यामुळे त्या दोघांच्या अफेअरच्या चर्चा आता सर्वांना खऱ्या वाटू लागल्या आहेत.

सलमाननं कतरिना दिली होती लग्नाची ऑफर पण...

कतरिना जेव्हा बॉलिवूडमध्ये आली त्यावेळी तिला सलमान खाननं खूप मदत केली असं म्हटलं जातं. त्यावेळी या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुद्धा झाल्या होत्या. पण नंतर त्यांचं ब्रेकअप झालं आमि कतरिनाचं नाव रणबीर कपूरशी जोडलं गेलं. त्यानंतर अर्पिताच्या लग्नात सलमाननं मी कतरिनाला कतरिना कैफ-खान होण्याची संधी दिली होती मात्र तिला कतरिना कैफ-कपूर व्हायचं आहे असं म्हटलं होतं.

अमिर खानच्या मुलीचं HOT फोटोशूट, पहा इराचा BOLD अंदाज

काही काळानं रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमानसोबत तिच्या लिंकअपच्या चर्चा झाल्या मात्र त्यांच्या वागण्यात आता वेगळेपणा जाणवतो. दोघांचेही रस्ते वेगळे झाले असले तरीही त्यांच्यातील मैत्री कायम आहे. त्यामुळे कतरिना सिंगल आहे. तर दुसरीकडे उरी फेम विकी सुद्धा कोणत्याही अभिनेत्री सोबत रिलेशनशिपमध्ये नाही.

VIDEO : तरुणीने बाहुबलीच्या गालात मारली 'थप्पड', त्यानंतर नेमकं काय घडलं...

=========================================================

इंडियन आयडलच्या मंचावरचा खास अनुभव, पाहा रोहित राऊत EXCLUSIVE

First published: November 14, 2019, 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading