सलमानची 'ही' एक्स गर्लफ्रेंड करतेय विकी कौशलला डेट ? नेहा धुपियानं केला गौप्यस्फोट

सलमानची 'ही' एक्स गर्लफ्रेंड करतेय विकी कौशलला डेट ? नेहा धुपियानं केला गौप्यस्फोट

नेहानं पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत झालेल्या रॅपिड फायर राउंडमध्ये बॉलिवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रिटींबाबत काही खुलासे केले.

  • Share this:

मुंबई, 8 मे : अभिनेत्री नेहा धुपिया तिच्या 'BFF विथ वोग' या शोमुळे सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रेनं सुद्धा तिच्या मैत्रिणी सुझान खान आणि गायात्री ओबेरॉय यांच्यासोबत या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यानंतर नुकतच नेहानं अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्यासोबत  'न्यू BFF इन टाउन'चं शूटिंग पूर्ण केलं. नुकतीच नेहानं पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत झालेल्या रॅपिड फायर राउंडमध्ये बॉलिवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रिटींबाबत काही खुलासे केले.

BFF विथ वोगमध्ये सेलिब्रिटींना प्रश्न विचारणाऱ्या नेहाची नुकतीच पिंकव्हिलानं मुलाखत घेतली. यावेळी सर्वात शेवटी एक रॅपिड फायर राउंड ठेवण्यात आला होता. मात्र याची उत्तरं देताना तोंडानं न बोलता फक्त डोळ्याची उघडझाप (आय ब्लिंक) करून या प्रश्नांची उत्तर द्यायची होती.  विधान बरोबर असल्यास एकदा आणि चुकीचं असल्यास दोन वेळा डोळ्याची उघडझाप करायची होती. यामध्ये नेहाला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. यात नेहाला विकी कौशल आणि कतरीना कैफ एकमेकांना डेट करत आहेत का यावर नेहानं दोन वेळा आय ब्लिंक करुन हे विधान चुकीचं असल्याचं सांगितलं. त्यामुळे विकी आणि कतरीनाच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


काही दिवसांपूर्वी एका चॅट शोमध्ये कतरीनानं विकी कौशलला डेट करायची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा जोरदार सुरू होत्या. तसेच काही दिवसांपूर्वी विकी कौशल आणि हरलीन सेठी यांच्या झालेल्या ब्रेकअपला सुद्धा कतरीना कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता नेहाच्या उत्तरानं विकी आणि कतरीना एकमेकांना डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या नेहा तिचं मातृत्व एंजॉय करत असून तिनं नुकताच आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस तिची मुलगी मेहर आणि पती अंगद बेदीसोबत साजरा केला.आता कतरिना कैफला सोडून दीपिकासोबत रोमान्स करणार सलमान खान?


‘मोदी तुम्ही तर पूर्णपणे मनातून उतरलात’, ट्वीटनंतर अभिनेता प्रियदर्शन जाधव झाला ट्रोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 02:59 PM IST

ताज्या बातम्या