मुंबई, 3 डिसेंबर- विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाच्या (Wedding) चर्चा गेल्या महिन्याभरापासून सुरू आहेत. मात्र त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट बरवारा येथे दोघेही पुढच्या आठवड्यात लग्न करणार आहेत असा दावा रिपोर्ट्समध्ये केला जात आहे.या विवाहाबाबत या जोडप्याने किंवा जिल्हा प्रशासनाने कोणताही दुजोरा दिलेला नाही. जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांना आदेश जारी करून शुक्रवारी सकाळी 10.15 वाजता बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
And it's not a speculation anymore.#VickyKaushal and #KatrinaKaif is going to marry on 9th Dec 2021.#Sawaimadhopur administration confirmed it. They are going to have a security meeting tomorrow in a backdrop of #VickyKatrinaWedding@E24bollynews @news24tvchannel pic.twitter.com/xB9vTOdaSn
— Ashwani kumar (@BorntobeAshwani) December 2, 2021
कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचा आढावा घेणे हा या बैठकीचा उद्देश असेल. अतिरिक्त जिल्हा अधिकारी सूरजसिंग नेगी यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ही बैठक जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यामध्ये एसपी, हॉटेलचे प्रतिनिधी आणि इतर अधिकारी असतील.
दुर्दैवाने, चाहत्यांना विकी-कतरिनाच्या भव्य लग्नाची झलक पाहायला मिळणार नाही. कारण इंडिया टुडेने वृत्त दिले आहे की विकी-कतरिनाच्या पाहुण्यांसाठी एसओपी तयार झाल्यानंतर आणखी एक अपडेट आला आहे. यानुसार, विकी आणि कतरिनाचे लग्न होत असलेल्या प्रॉपर्टीजवळ कोणताही ड्रोन आढळल्यास तो पाडण्यात येईल. सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ आणि फोटो शेअर होणार नाही याची खात्री करण्यासाठी हे आहे.
(हे वाचा:Sara Ali Khan ने लग्नासाठी ठेवली 'ही' अट; 'या' मुलाला बनवणार जोडीदार )
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या पाहुण्यांना फोटोशिवाय एनडीए करारावर स्वाक्षरी करण्यास सांगितले आहे. किंबहुना, लग्न गोपनीय ठेवण्यासाठी लग्नस्थळाजवळ उडणारे ड्रोनही खाली पाडले जाईल. हे सुनिश्चित करण्यासाठी आहे की लग्नाचे कोणतेही फोटो आणि व्हिडिओ ऑनलाइन लीक होणार नाहीत.मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न राजस्थानच्या सवाई माधोपूरमध्ये पार पडणार आहे. 6 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांना गुप्त संकेताच्या आधारे प्रवेश दिला जाईल. लग्नात सहभागी होणाऱ्या सर्व पाहुण्यांची ओळखही गुप्त ठेवण्यात येणार आहे. हॉटेलच्या खोलीलाही दिलेल्या कोडवरून प्रवेश मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal