'यापेक्षा CUTE काहीच नाही', कतरिनाने बहिणीबरोबर केलेल्या VIDEO वर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

'यापेक्षा CUTE काहीच नाही', कतरिनाने बहिणीबरोबर केलेल्या VIDEO वर चाहत्यांच्या प्रतिक्रिया

अभिनेत्री कतरिना कैफने तिची बहिण Isabelle Kaif बरोबर इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ खूपच जास्त cute असल्याच्या प्रतिक्रिया तिचे चाहते देत आहेत.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै : लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif ) सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाली आहे. या कालावधीमध्ये तिने घरातील काम करताना, गेम्स खेळताना असे विविध व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. दरम्यान कैफ कुटुंबातील आणि एक व्यक्ती सोशल मीडियावर आणि बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी झोतात येत आहे. ती म्हणजे कतरिनाची बहिण इझाबेल कैफ (Isabelle Kaif). कतरिनाने नुकताच तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये (Instagram Video) कतरिनाने इन्स्टाग्रामचे Reel फिल्टर वापरला आहे आणि यामध्ये ती तिच्या बहिणीबरोबर घरातील काम करताना दिसत आहे. कतरिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 'All day every day. I think this is what u do with reels' असं कॅप्शन देत कतरिनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

(हे वाचा-बॉलिवूडवर पुन्हा शोककळा,पाणावलेल्या डोळ्यांनी जावेद जाफरीने केलं वडिलांना अलविदा)

हा व्हिडीओ विशेष प्रसिद्ध होत आहे तो या दोघींच्या Cuteness मुळे. कतरिनाच्या सोशल मीडियावरील कुटुंबाने अर्थात तिच्या चाहतेवर्गाने हा व्हिडीओ सर्वात Cute असल्याचे म्हटले आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास साडेआठ लाख लाइक्स मिळाले आहेत. यामध्ये कतरिना तिच्या बहिणीबरोबर धमाल मस्ती करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

All day every day I think this is what u do with reels #feelkaroreelkaro

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

याआधी देखील कतरिनाने बऱ्याचदा तिच्या बहिणीबरोबर व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावेळी देखील त्यांना चाहत्यांकडून कौतुकास्पद प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास कतरिना या काळात अक्षय कुमारबरोबर सूर्यवंशी या चित्रपटात दिसणार होती. मात्र लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. रोहित शेट्टीच्या 'कॉप युनिव्हर्स'मधील हा महत्त्वाचा चित्रपट असणार आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: July 9, 2020, 4:14 PM IST

ताज्या बातम्या