अक्षय-कतरिनाची इंटिमेट केमिस्ट्री : अक्षयनेच लीक केला VIDEO

'सूर्यवंशी' सिनेमातील एक इंटिमेट सीन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 7, 2019 04:53 PM IST

अक्षय-कतरिनाची इंटिमेट केमिस्ट्री : अक्षयनेच लीक केला VIDEO

मुंबई, 07 नोव्हेंबर : अभिनेता अक्षय कुमार मागच्या काही दिवसांपासून त्याचा आगामी सिनेमा 'सूर्यवंशी'मुळे खूप चर्चेत आहे. या सिनेमात पुन्हा एकदा अभिनेत्री कतरिना कैफ त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं शूट झालं. त्यानंतर सध्या अक्षय या सिनेमाच्या उर्वरित शूटिंग पूर्ण करत आहे. दरम्यान या सिनेमातील एक इंटिमेट सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि विशेष म्हणजे खुद्द अक्षय कुमारनंच हा व्हिडीओ लीक केला आहे.

काही दिवसांपूर्वीच अक्षयचं फिलहाल या गाण्याचा ट्रेलर रिलीज झाला. ज्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसादही मिळाला. या गाण्यात अक्षयसोबत अभिनेत्री कृती सेननची बहीण नुपूर सेनन हिनं स्क्रीन शेअर केली आहे. मात्र अनेकांना हे गाणं पाहिल्यावर अक्षय आणि कतरिनाच्या नमस्ते लंडन या सिनेमाची आठवण झाली. त्यानंतर अक्षयनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन सूर्यवंशी सिनेमातील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

टॉपलेस होत राखी सावंतनं शेअर केला VIDEO, पतीला म्हणाली...

अक्षयनं व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, फिलहाल गाण्याला तुम्ही सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. यावर आलेल्या कमेंट वाचताना मला असं दिसून आलं की तुम्हाला सर्वांना हे गाणं पाहिल्यावर 'नमस्ते लंडन'ची आठवण झाली. त्यामुळे कतरिनासोबतचं सूर्यवंशीच्या सेटवरील एक सरप्राइज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे.

Loading...

सध्या सूर्यवंशी या सिनेमाचं शूटिंग सुरु असून या आधी या सिनेमातील 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याचं शूट पूर्ण झालं आहे. अक्षयनं ‘मोहरा’ सिनेमाच्या 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याचे हक्क विकत घेतले असून हेच गाणं आता रिक्रिएट करून सूर्यवंशीसाठी वापरण्यात येणार आहे आणि रवीनाच्या जागी आता कतरिना पाहायला मिळणार आहे.  हा सिनेमा 27 मार्च 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?' पाहा Vicky Velingkar Teaser

VIDEO : ऐश्वर्या राय झाली सिंगर, आवाज ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

==========================================================

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर नांगरे पाटलांनी घेतली बैठक, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 7, 2019 04:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...