S M L

कतरिना मारतेय 'पुश अप्स'

या व्हिडिओमध्ये कतरिना चक्क हाताचा आधार न घेताही पुशअप्स मारताना दिसते आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jul 25, 2017 03:27 PM IST

कतरिना मारतेय 'पुश अप्स'

25 जुलै : कतरिना कैफचा 'पुश अप्स' मारतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कतरिना चक्क हाताचा आधार न घेताही पुशअप्स मारताना दिसते आहे.

सध्या कतरिना सलमान खानसोबत टायगर जिंदा या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमासाठी कतरिना भरपूर वर्कआऊट करते आहे. या सिनेमाच्या सेटवरती भरपूर थट्टा मस्करीही होत असते. अशाच मस्करीच्यावेळी कतरिनाने हा व्हिडिओ इंस्ट्राग्रामवरती शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुरुवातीला कतरिना दोन्ही हातांवर पुश अप्स मारतेय. पण काही क्षणातच ती वन हॅन्ड पुश अप्स मारताना दिसते. त्यानंतर ती दोन्ही हात पाठीमागे ठेवून हाताचा आधार न घेता पुश अप्स मारताना दिसते. पण यानंतर कळतं की या सगळ्या पुश अप्स कतरिना एका लाकडी प्लँकच्या मदतीने करते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धमाल व्हिडिओ पाहूयात.

Warming up on set . @rezaparkview

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 03:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close