मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

कतरिना-विकी पहिल्यांदाच झळकणार एकत्र! नवदांपत्याने साईन केला खास प्रोजेक्ट

कतरिना-विकी पहिल्यांदाच झळकणार एकत्र! नवदांपत्याने साईन केला खास प्रोजेक्ट

आजपर्यंत विकी-कतरिनाने कोणत्याही प्रकारच्या प्रोजेक्ट किंवा जाहिरातीत एकत्र काम केले नाही.

आजपर्यंत विकी-कतरिनाने कोणत्याही प्रकारच्या प्रोजेक्ट किंवा जाहिरातीत एकत्र काम केले नाही.

आजपर्यंत विकी-कतरिनाने कोणत्याही प्रकारच्या प्रोजेक्ट किंवा जाहिरातीत एकत्र काम केले नाही.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 17 डिसेंबर-   विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह (Vicky Kaushal Katrina Kaif Wedding) 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे झाला. लग्नापूर्वी दोघेही जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट करत होते. मात्र यादरम्यान विकी-कतरिनाने कोणत्याही प्रकारच्या प्रोजेक्ट किंवा जाहिरातीत एकत्र काम केले नाही. पण आता निर्मात्यांना या दोघांना एकत्र कास्ट करायचे आहे. लग्नानंतर दोघांनाही अप्रतिम ऑफर्स मिळत असल्याचं म्हटलं जात आहे. आतापर्यंत अनेक निर्मात्यांनी दोघांनाही चित्रपटात कास्ट करण्यासाठी संपर्क साधला आहे.

ETimes च्या रिपोर्टनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी एकत्र एक नवीन प्रोजेक्ट साइन केला आहे. नवविवाहित जोडपे लवकरच एका जाहिरातीत एकत्र दिसणार आहे. सूत्राच्या माहितीनुसार, “विकी आणि कतरिनाला एका हेल्थ प्रॉडक्टची ऑफर देण्यात आली आहे. आणि लवकरच त्याचे चित्रीकरण होईल." विकी आणि कतरिनाने आणखी एका लक्झरी ब्रँडसाठी साइन अप केल्याचेही सूत्राने सांगितलं आहे.

विकी कौशल-कतरिना कैफ रॉयल वेडिंग आणि मालदीवमध्ये हनिमून व्हेकेशननंतर दोघेही मुंबईत परतले आहेत. वर्क कमिटमेंट आणि वेडिंग रिसेप्शन पार्टीसाठी ते हनिमूनहून लवकर परतल्याचे बोलले जात आहे. आता दोघांनीही त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनची तयारी सुरू केली आहे. या दोघांच्या जवळच्या सूत्राने बॉलिवूड लाईफला दिलेल्या माहितीनुसार, विकी आणि कतरिना संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीसाठी एका भव्य रिसेप्शन पार्टीची तयारी करत आहेत.

(हे वाचा: OMG! उर्वशी रौतेलाने परिधान केला इतका महागडा ड्रेस! त्या किंमतीत खरेदी कराल कार)

हे दोघेही येत्या २० डिसेंबरला ही रिसेप्शन पार्टी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच हे दोघेही इतक्या घाईत मालदीवहुन परतल्याच म्हटलं जात आहे. कतरिना आणि विकीने मुंबईपासून दूर राजस्थानमध्ये कुटुंब आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा ऊरकला होता. त्यामुळे आता हे दोघेही सर्वांना आपल्या रिसेप्शन पार्टीमध्ये आमंत्रित करणार आहेत. असंही म्हटलं जात आहे, कि कतरिना आणि विकीला आपल्या कामावर परतण्यापूर्वी लग्नाचे सर्व कार्यक्रम उरकून घ्यायचे आहेत. आणि म्हणून हे दोघेही गडबड करत आहेत.

First published:

Tags: Entertainment, Katrina kaif, Vicky kaushal