माझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ

माझ्या बाबतीतही भेदभाव केला गेलाय - कतरिना कैफ

कतरिना कैफ सध्या खूप बिझी आहे. झीरो सिनेमाचं काऊंट डाऊन सुरू झालंय. त्यामुळे ती मीडियाशी संवाद साधतेय. अशाच एका मुलाखतीत तिनं #MeTooबद्दलही आपलं मत मांडलं.

  • Share this:

मुंबई, 18 डिसेंबर : कतरिना कैफ सध्या खूप बिझी आहे. झीरो सिनेमाचं काऊंट डाऊन सुरू झालंय. त्यामुळे ती मीडियाशी संवाद साधतेय. अशाच एका मुलाखतीत तिनं #MeTooबद्दलही आपलं मत मांडलं.

ती म्हणाली, ' हे कँपेन सुरू आहे ही चांगली गोष्ट आहे. महिला इतक्या प्रमाणात पुढे येतायत, हे खरोखर कौतुकास्पद आहे. स्त्री असो वा पुरुष... कोणीही सुपिरियर नाही. स्त्रियांचा सन्मान केलाच पाहिजे.'

बोलता बोलता तिनं एक उदाहरणही दिलं. ती म्हणाली, ' एकदा एक मुलाखत सुरू होती. माझ्या बरोबर एक पुरुष कलाकार होता. मुलाखत घेणारा जणू मला बघतच नव्हता. त्याला मी दिसत नव्हते.' कॅट म्हणाली, मी तर एक ओळखीचा चेहरा असून मला हा अनुभव आला. पण सर्वसामान्य स्त्रीला असा भेदभाव अनुभवायला मिळतो. हे चूक आहे.

एका मुलाखतीत कतरिना सलमानबद्दलही मनमोकळं बोलली आहे. ती म्हणाली, ' सलमान माझा खूप चांगला मित्र आहे आणि तसाच राहील. आम्ही अनेक महिने एकमेकांशी बोलत नाही, भेटत नाही. पण मी कधी खूप अपसेट असते, तेव्हा तो नेमका माझ्या समोर येऊन उभा राहतो. त्याला कसं कळतं कोण जाणे!'

कतरिनानं तिचं आणि सलमानचं बाँडिंग दिलखुलासपणे सांगितलं. ती हेही म्हणाली की माझ्या कठीण काळात माझ्या 6 बहिणी आणि आई मला साथ देतात.

कतरिना पहिल्यांदाच व्होग मासिकाशी बोलताना म्हणाली, आपण एखाद्या व्यक्तीवर फोकस करतो, आपला आनंद त्याच्यात शोधत असतो. तेव्हा स्वत:कडे पहात नाही.

पुढे ती म्हणाली, ' आता मी माझ्याकडेच नीट पाहू शकते. माझ्याच अनेक गोष्टींचा विचार करू शकते. म्हणूनच ब्रेकअप माझ्यासाठी मोठा आशीर्वाद ठरलंय.

स्वप्नील जोशी म्हणतोय, मी पण सचिन!

First published: December 18, 2018, 6:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading