आपल्या लव्ह लाइफबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट बोलली कतरिना

नुकतंच कतरिनानं प्रेमाबद्दल एक विधान केलंय. आपल्या लव्हलाईफबद्दल तिनं काय म्हटलंय ते पहा.

News18 Lokmat | Updated On: Nov 12, 2018 08:05 AM IST

आपल्या लव्ह लाइफबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट बोलली कतरिना

मुंबई, 12 नोव्हेंबर : ठग्स आॅफ हिंदोस्तान सिनेमावर कितीही टीका झाली तरी एक गोष्ट प्रेक्षकांना खूप आवडतेय. ती म्हणजे कतरिना कैफचं नृत्य. तिची दोन गाणी कमालीची हिट झालीयत. नुकतंच कतरिनानं प्रेमाबद्दल एक विधान केलंय. आपल्या लव्हलाईफबद्दल तिनं काय म्हटलंय ते पहा.


करण जोहरच्या काॅफी विथ करणमध्ये कतरिना येणार आहे. त्यात तिला प्रश्न विचारलाय की, तू प्रेमाकडे कसं पाहतेस? 'प्रेमात तुम्ही नेहमी पाहता की तुमचा जोडीदार तुमच्याकडे किती लक्ष देतोय, किती प्रेम करतोय. ती चांगली गोष्ट नाही. त्यामुळे तुमच्या संबंधांवर, रिलेशनशिपवर परिणाम होऊ शकतो.' कतरिना म्हणते.


पुढे ती म्हणाली, ' स्त्रीच्या आयुष्यात पुरुष हवाच. पण तुम्ही तुमचा आनंद तुमच्या जोडीदारामध्ये शोधता. याचा परिणाम नात्यावर होऊ शकतो.' कतरिना आणि रणबीर कपूरचं नातं तुटलं. काही महिने दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या बोलण्यात तिचं दु:ख चांगलंच जाणवलंय.

Loading...


कतरिना सध्या सलमानच्या 'भारत'मध्ये काम करतेय.'भारत'चं शूटिंग जोरात सुरू आहे. प्रियांका चोप्राच्या जागी कतरिना कैफ आली. 'भारत'मध्ये आता आपल्याला कतरिना आणि सलमान खान दिसणार आहे.


. कॅट आणि सलमानचं प्रेम पुन्हा बहरणार असं दिसतंय. कारण सलमाननं फेसबुकवर सुशील कन्या असा कतरिनाचा उल्लेख केला होता. आता भारतसाठी तर प्रियांका नक्की झाली होती. ऐनवेळी कतरिनाला विचारलं आणि तिनं कुठलाच इगो प्राॅब्लेम न आणता पटकन हो म्हटलं.


'भारत'चा एक फोटो काही दिवसांपूर्वी बाहेर आलाय. त्यात सलमानच्या बाहुपाशात कतरिना आहे. खुद्द सलमाननं हा फोटो ट्विट केलाय. सिनेमाचं शूटिंग माल्टा इथे सुरू आहे. दोघंही भारतीय पोशाखात आहेत. ते एकमेकांसोबत खूप सुंदर दिसतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 12, 2018 08:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...