28 आॅक्टोबर : कतरिना कैफ सध्या 'टायगर जिंदा है'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. नुकतीच ती सलमान खान आणि टीमबरोबर अबुधाबीमध्ये शूटिंग करत होती. त्यानंतर ती ग्रीससाठी टीमसोबत रवाना झाली.
दरम्यान, कतरिनानं विमानतळावर शाॅपिंग केलंं. सध्या तो व्हिडिओ व्हायरल झालाय. कतरिना एका छोट्या मुलीबरोबर खरेदी करतेय. ती मुलगी व्हिडिओ गेम उघड म्हणून सांगतेय. त्यावर ती म्हणतेय, उघडलं तर खरेदी करावं लागेल.
हा क्युट व्हिडिओ 'टायगर जिंदा है'चा दिग्दर्शक अली अब्बास जाफरनं इंस्ट्राग्रामवर टाकलाय.
कतरिना कैफ आमिर खानच्या 'थग्ज आॅफ हिंदोस्तान'मध्येही आहे. टायगर जिंदा है 22 डिसेंबरला रिलीज होतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Katreena kaif, Tigar jinda hai, कतरिना कैफ, टायगर जिंदा है