मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

...आणि कतरिनानं दिला सलमान खानला 'होकार'

...आणि कतरिनानं दिला सलमान खानला 'होकार'

कॅट सांगते, 'अली अब्बास जफर आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. 'मेरे ब्रदर की दुल्हन'  आणि 'टाइगर जिंदा है' हे सिनेमे आम्ही एकत्र केलेत.  ते खूप चांगले चाललेत.'

कॅट सांगते, 'अली अब्बास जफर आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'टाइगर जिंदा है' हे सिनेमे आम्ही एकत्र केलेत. ते खूप चांगले चाललेत.'

कॅट सांगते, 'अली अब्बास जफर आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. 'मेरे ब्रदर की दुल्हन' आणि 'टाइगर जिंदा है' हे सिनेमे आम्ही एकत्र केलेत. ते खूप चांगले चाललेत.'

मुंबई, 02 आॅगस्ट : 'भारत'मध्ये आता आपल्याला कतरिना आणि सलमान खान दिसणार आहे. प्रियांकाचा विषय आता संपलाय. कॅट आणि सलमानचं प्रेम पुन्हा बहरणार असं दिसतंय. कारण सलमाननं फेसबुकवर सुशील कन्या असा कतरिनाचा उल्लेख केला होता. आता भारतसाठी तर प्रियांका नक्की झाली होती. ऐनवेळी कतरिनाला विचारलं आणि तिनं कुठलाच इगो प्राॅब्लेम न आणता पटकन हो म्हटलं. कॅटनं अचानक सलमानला होकार का दिला असेल?

याबद्दल कॅट सांगते, 'अली अब्बास जफर आणि माझी खूप चांगली मैत्री आहे. 'मेरे ब्रदर की दुल्हन'  आणि 'टाइगर जिंदा है' हे सिनेमे आम्ही एकत्र केलेत.  ते खूप चांगले चाललेत. मग ऐनवेळी मला विचारलं, रिप्लेसमेंट केली असे विचार मी का आणायचे?'

ती म्हणते, ' मी भारतचं पूर्ण स्क्रीप्ट वाचलं. माझी भूमिका काय आहे ते पाहिलं. ते सगळंच खूप दमदार आहे. म्हणून मी ही भूमिका स्वीकारली. '

हेही वाचा

इम्रान खान यांच्या शपथविधीला आमिर खान जाणार नाही

VIDEO : हातात हात घालून पहिल्यांदा केला कतरिना-सलमाननं रॅम्पवाॅक

चित्रपट नफा कमवेपर्यंत मी एकही रुपया घेत नाही- आमिर खान

प्रियांका चोप्रा आणखी एका हॉलिवूडपटात झळकणार आहे. क्रिस पॅटसोबत 'काऊबॉय निंजा वायकिंग' या सिनेमात प्रियांका काम करणार आहे असं हॉलिवूड रिपोर्टरच्या वृत्तानुसार स्पष्ट झालंय. ब्रेकिंग बॅड आणि गेम ऑफ थ्रोन्सच्या दिग्दर्शिका मिशेल मॅकलॅरन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. हा हॉलिवूडचा बिग बजेट सिनेमा असेल आणि 2019 च्या जूनमध्ये प्रदर्शित होईल असं बोललं जातंय.सलमान खानसोबत भारत हा सिनेमा नाकारल्यानंतर प्रियांकाने थेट हॉलिवूडचा सिनेमा स्वीकारलाय.त्यामुळे यापुढे तिचा कल हा बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडकडे असणार हे वेगळं सांगायची गरज नाही.

सलमान खानच्या 'भारत'चं शूटिंग सुरू झालंय आणि सिनेमातला सलमानचा लूकही समोर आलाय. प्रियांका चोप्राही मेहबूब स्टुडिओत काही दिवसांपूर्वी दिसली होती. भारत सिनेमाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. सलमान खान या सिनेमात 5 लूकमध्ये दिसणार आहे. वय वर्ष 25 ते वय वर्ष 65पर्यंतचा त्याचा प्रवास या सिनेमात आहे.

First published:

Tags: Ali abbas, Bharat, Katreena kaif, Salman khan, कतरिना कैफ, भारत, सलमान खान