11 सप्टेंबर : कतरिना कैफ सध्या 'टायगर जिंदा है'च्या शूटमध्ये बिझी आहे. पण या शूटमधून ती वेळ काढून स्वत:चा चांगला टाइमपासही करतेय.
नुकताच तिनं शूटिंगच्या ठिकाणी क्रिकेट खेळत असल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. यात ती बॅटिंग करतेय. आणि युनिटचे काही जण फलंदाजी करतायत.
या व्हिडिओबरोबर तिनं एक कॅप्शन लिहिलीय. ती लिहितेय, ' लोक तिच्या शाॅटसची उगाचंच खोटी तारीफ करतायत. ' ती म्हणते, शूटिंगदरम्यान तिनं सर्फिंग, वाॅलिबाॅल खेळली. आणि आता क्रिकेट खेळतेय.
हा व्हिडिओ पाहून काय सांगावं, कतरिना लवकरच क्रिकेट टीमचा हिस्सा बनेलही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, Katreena kaif, कतरिना कैफ, क्रिकेट