'भारत'मध्ये प्रियांकाच्या जागी कतरिना?

भारत हा सलमानचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. सलमानसोबत काम करणाऱ्या सगळ्या नायिका एकदम समोर आल्या. अनुष्का असेल, सोनम असेल, सोनाक्षी सिन्हा असेल. कोण असेल?

News18 Lokmat | Updated On: Jul 27, 2018 12:46 PM IST

'भारत'मध्ये प्रियांकाच्या जागी कतरिना?

मुंबई, 27 जुलै : प्रियांका चोप्रानं 'भारत' सोडला. आणि मग एकच चर्चा सुरू झाली की प्रियांकाच्या जागी आता कोण असणार आहे? अख्खं बाॅलिवूड आता तीच चर्चा करतेय. एक तर कुणी तरी अचानक सिनेमा सोडणं बाॅलिवूडला नवं नाही. पण भारत हा सलमानचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. सलमानसोबत काम करणाऱ्या सगळ्या नायिका एकदम समोर आल्या. अनुष्का असेल, सोनम असेल, सोनाक्षी सिन्हा असेल. कोण असेल? इतक्या असण्याची शक्यता तशी कमीच वाटतेय. ऐश्वर्या...साॅरी साॅरी, तिचा काही संबंध नाही म्हणा.

हेही वाचा

...म्हणून प्रियांका चोप्रानं 'भारत' सोडला

मला मराठी सिनेमात काम करायचंय- जाॅन अब्राहम

ट्रेड मिलवर वर्कआउट करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी

तर एकच नाव पुढे येतंय. ते म्हणजे कतरिना कैफ. दिग्दर्शकानं स्वत: ट्विट करून प्रियांकानं सिनेमा सोडल्याची माहिती दिली. पण आता तोच कतरिनाची निवड करेल असं म्हणतायत. आॅन स्क्रीन सलमान-कतरिना खूपच चांगले दिसतायत. शिवाय आजही सलमानला कतरिनाबद्दल साॅफ्ट काॅर्नर आहेच की. टायगर जिंदा है सिनेमात दोघंही मस्त दिसत होते. त्यामुळे आता सगळे वाट पाहतायत कतरिनाच्या नावाची कधी घोषणा होतेय?

प्रियांका चोप्रा सध्या भारतात आहे. तिला मेहबूब स्टुडिओच्या बाहेर पाहिलं होतं. त्यामुळे भारत सिनेमात सलमान आणि प्रियांका दिसणार अशा बातम्या सुरू होत्या. त्यामुळे फॅन्सही खूश होते. पण आता एक बातमी आलीय. त्यामुळे फॅन्सची खूप निराशा होणार आहे. प्रियांका चोप्रानं 'भारत' सोडलाय. सिनेमाच्या दिग्दर्शकानं तसं ट्विट केलंय.  त्यावरून तर असं जाणवतंय की प्रियांका चोप्रा तिचा बाॅयफ्रेंड निकसोबत लग्न करतेय. आणि त्यामुळेच ती सिनेमा सोडतंय.

भारत सिनेमाचं शूटिंग सुरू झालंय. सिनेमात दिशा पटानी, तब्बूही आहेत . आता पुन्हा अभिनेत्रीचा शोध सुरू करावा लागणार आहे. या बहुचर्चित सिनेमात कोण अभिनेत्री असणार, सलमानची जोडी कोणाबरोबर असणार हे प्रश्न आता सगळ्यांना पडलेत.  प्रियांकानं सोनाली बोसचा 'स्काय इज पिंक' हा सिनेमाही साईन केलाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2018 12:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close