16 जानेवारी : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि कतरिना कैफ सध्या कोरिओग्राफर प्रभुदेवाकडून डान्सचे धडे घेतायत. कॅटने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आमिर आणि प्रभुदेवासोबतचा एक फोटो शेअर केलाय. कतरिनाने शेअर केलेला हा फोटो डान्स प्रॅक्टिस दरम्यानचा आहे.
आमिर-कतरिना सध्या त्यांच्या 'ठग्ज आॅफ हिंदोस्थान' या सिनेमातील सुपरहिट गाण्यासाठी मेहनत घेताना दिसतायत. आता आमिर प्रभुच्या स्टेप्सवर कसा थिरकणार हे पाहणं मोठं रंजक ठरणारेय.
ठग्ज आॅफ हिंदोस्थान सिनेमात बिग बी आमिर खानच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. या वर्षातली ही मोठी ट्रीट ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aamir khan, Katreena kaif, Prabhudeva, आमिर खान, कतरिना कैफ, प्रभुदेवा