Home /News /entertainment /

Baahubali 'कटप्पा' फेम सत्‍यराज यांनी केली कोरोनवार मात, समोर आली हेल्थ अपडेट

Baahubali 'कटप्पा' फेम सत्‍यराज यांनी केली कोरोनवार मात, समोर आली हेल्थ अपडेट

बाहुबली(Baahubali)चित्रपटामध्ये कटप्पा (Katappa)’ नावाने ओळखले जाणारे दाक्षिणात्य दिग्गज स्टार सत्यराज (Sathyaraj) यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांनी कोरोनावर मात करत कोरोनाची लढाई जिंकली आहे.

    मुंबई, 11 जानेवारी - बाहुबली(Baahubali)चित्रपटामध्ये कटप्पा (Katappa)’ नावाने ओळखले जाणारे दाक्षिणात्य दिग्गज स्टार सत्यराज (Sathyaraj) यांना नुकतीच कोरोनाची (Coronavirus/COVID-19) लागण झाली होती. आता त्यांनी कोरोनावर मात करत कोरोनाची लढाई जिंकली आहे.गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनोशी लढत होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना चेन्नईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात (Sathyaraj admitted to hospital in Chennai)आलं होते. त्याआधी सत्यराज होम आयसोलेशनमध्ये होते. आता मात्र त्यांनी कोरोनाची लढाई जिंकली आहे. शिवाय त्यांच्या तब्येत देखील पहिल्यापेक्षा आता चांगली असल्याची माहिती समोर आली आहे. सत्यराज यांना रूग्णालयातून जिस्चार्ज देण्यात आला आहे. याबद्दल माहिती सत्यराज यांचा मुलाग सिबी सत्यराज याने ट्विटरवरून दिली आहे. सिबीने ट्वीट करत म्हटले आहेकी, मित्रांनो..अप्पांना काल रात्री रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. आता ती पूर्णपणे ठीक आहे. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते कामाल सुरूवात करणार आहेत. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद यासाठी सर्वांचे मनापासून आभार! दिग्गज अभिनेते सत्यराज तमिळ चित्रपटांचे सुपरस्टार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. बाहुबलीमधील कटप्पाच्या भूमिकेने त्यांना संपूर्ण देशात लोकप्रियता मिळवून दिली. 1978 मध्ये 'सत्तम एन कायल' या चित्रपटातून त्यांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 1985 मध्ये प्रदर्शित झालेला 'सावी' हा त्यांचा मुख्य अभिनेता म्हणून पहिला चित्रपट होता. त्यांनी प्रदीर्घ काळ प्रॉडक्शन मॅनेजर म्हणूनही काम केले. वाचा-मराठी कलाविश्वात कोरोनाचा कहर! जितेंद्र जोशीसह या सेलेब्सना झाला कोरोना गेल्या काही दिवसांत तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी कोविड-19 पॉझिटिव्ह आले आहेत. साऊथचा सुपरस्टार महेश बाबू, मंचू मनोज, मंचू लक्ष्मी यांसारखे अनेक चित्रपट कलाकार कोरोनाशी युद्ध लढत आहेत. बॉलिवूड, मराठी मनोरंजन विश्व तसेच हिंदी व मराठी टीव्ही जगतातील अनेक कलाकारांना व घरच्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मनोरंजन विश्वात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर माजवला आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment, Tollywood

    पुढील बातम्या