'काटा किर्रर्र' फेम मेघा घाडगेंच्या फेसबुक पोस्टवर तरुणाकडून किळसवाण्या कमेंट, पोलिसांत केली तक्रार

'काटा किर्रर्र' फेम मेघा घाडगेंच्या फेसबुक पोस्टवर तरुणाकडून किळसवाण्या कमेंट, पोलिसांत केली तक्रार

अत्यंत किळसवाण्या शब्दात या तरुणाने कमेंट केल्या आहे. या कमेंटमुळे काही युझर्सनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्याला पोलिसांत देण्याची मागणी केली आहे.

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

वसई, 23 फेब्रुवारी :  नृत्य अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या फेसबुक पोस्टवर एका व्यक्तीने अश्लील कमेंट केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तब्बल  १२ तासांनी  नयानगर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

नृत्य अभिनेत्री मेघा घाडगे यांनी आपल्या एका सहकलाकारांसोबत एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर त्या पोस्टवर स्वरूप पांडा नामक व्यक्तीने अश्लील कमेंट केल्याच समोर आलं. त्याच्या या कमेंटमुळे मेघा यांना मोठा धक्का बसला. अत्यंत किळसवाण्या शब्दात या तरुणाने कमेंट केल्या आहे. या कमेंटमुळे काही युझर्सनी तीव्र नाराजी व्यक्त करत त्याला पोलिसांत देण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे मेघा यांनी  थेट मिरारोड मधील नया नगर पोलीस ठाणे गाठलं. मात्र, नयानगर पोलिसांनी तब्बल १२ तासांनी तक्रार दाखल केली असल्याचा आरोप केला आहे.

या संपूर्ण घटनेमुळे मेघा यांना मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर झाला असून पोलीस जर अश्या प्रकारे आमच्या सारख्या व्यक्तींना १२ तास थांबवत असतील तर सामान्य माणसाचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पोलिसांनी कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. मला अजून ही कोणताही प्रकारचा फोन आला नाही. यामुळे मला जास्त त्रास होत आहे.  कमेंट करणारी ही जी कोणी  व्यक्ती आहे. ज्यांनी ही कमेंट केली त्याला अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी मेघा घाडगे यांनी केली.

दरम्यान, नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

First published: February 23, 2020, 8:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading