मुंबई, 29 नोव्हेंबर : गोव्यात 53वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल सुरू होता अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये इफ्फी पुरस्काराचं वितरण होतं. तसेच अनेक सिनेमाचं स्क्रिनिंग केलं जातं. मात्र यंदाचा इफ्फी महोत्सव वादाच्या भोवऱ्यात आला आहे. या वादाचं कारण आहे तो म्हणजे विवेक अग्निहोत्री यांचा काश्मीर फाइल्स हा सिनेमा. महोत्सवात अनेक दिग्गज आपलं मनोगत मांडत होते आपल्या भावना व्यक्त करत होते. अशातच ज्यूरी हेड आणि इस्रायली सिनेमांचे निर्माते नादव लॅपिड यांनी मनोगत व्यक्त करताना काश्मीर फाइल्स सिनेमावर चांगलाच निशाणा साधला. 300 कोटीहून अधिक रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाला अनेकांची डोक्यावर घेतलं मात्र मानाच्या अशा इफ्फी महोत्सवात मात्र सिनेमावर चांगलीच टीका करण्यात आली.
निर्माते नादव लॅपिड यांचा महोत्सवातील मनोगताना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ते म्हणाले, 'इफ्फी महोत्सवातील 15वा सिनेमा होता द काश्मीर फाईल्स . पण हा सिनेमा पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसला. आम्ही सगळे अस्वस्थ झालो. हा सिनेमा एका विशिष्ट प्रोपगंडा असलेला आणि वल्गर आहे. इफ्फी सारख्या प्रतिष्ठित महोत्सवात काश्मीर फाईल्स सारख्या सिनेमाला स्थान मिळालं हे अयोग्य आहे'.
हेही वाचा - Anshula Kapoor: अर्जुन कपूरची बहिण 'या' सेलिब्रिटीला करतेय डेट; रोमॅन्टिक VIDEO व्हायरल
#Breaking: #IFFI Jury says they were “disturbed and shocked” to see #NationalFilmAward winning #KashmirFiles, “a propoganda, vulgar movie” in the competition section of a prestigious festival— organised by the Govt of India. 🎤 Over to @vivekagnihotri sir… @nadavlapi pic.twitter.com/ove4xO8Ftr
— Navdeep Yadav (@navdeepyadav321) November 28, 2022
द काश्मीर फाईल्स हा सिनेमा 2022मधला बेस्ट सिनेमा आहे. सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 1990मध्ये काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या काश्मीरी पंडितांची कहाणी सिनेमात दाखवण्यात आली. अनुपम खेर, मिशुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी तसचं मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सिनेमात प्रमुख भूमिकेत होते.
सिनेमाला भाजपकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेक राज्यांमध्ये काश्मीर फाईल्स हा सिनेमा टॅक्स फ्री म्हणून घोषित करण्यात आला होता. समीक्षकांशिवाय सिनेमाचं प्रेक्षकांनीही प्रचंड कौतुक केलं. कोणतंही मोठं प्रमोशन न करता सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. थिएटर्स हाऊसफुल्ल होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News