पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्वीट, सुरू झालं ट्विटर वॉर

पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्वीट, सुरू झालं ट्विटर वॉर

तिच्या या ट्वीटमुळे लोकांचा पारा चढला. यानंतर काही मिनिटांतच वीणाला तिच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळायला सुरुवात झाली.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट- वीणा मलिक आणि कॉन्ट्रोव्हर्सी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जेव्हा केव्हा सगळीकडे शांततेचं वातावरण असतं वीणा वादग्रस्त ट्वीट शेअर करून स्वतः नवा वाद सुरू करते. नुकतच तिने आक्षेपार्ह ट्वीट करत लिहिलं की, 'काश्मीर आणि काश्मिरींच्या विरुद्ध भारतीय सेनेकडून केल्या जाणाऱ्या अत्याचारासाठी...' आता वीणा मलिकसारख्या व्यक्तिकडून समजूतदारपणाची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. तिच्या या ट्वीटमुळे लोकांचा पारा चढला. यानंतर काही मिनिटांतच वीणाला तिच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळायला सुरुवात झाली.

काही लोकांनी वीणाला तिने भारतात घालवलेला वेळ आणि केलेलं काम लक्षात आणून दिलं. तर काहींनी तिला तिचं स्वयंवराची आठवण करून दिलं. या शोमुळे तिला लोकप्रियता तर मिळालीच होती याशिवाय भरमसाठ पैसेही मिळाले होते. काही नेटकऱ्यांनी तिला भारतात येण्याचा सल्ला दिला. पहिल्यांदा वीणा लाइमलाइटमध्ये तेव्हा आली जेव्हा तिने भारत- पाकिस्तान सामन्यात झालेल्या मॅच फिक्सिंगबद्दल खुलासे केले. यानंतर ती बिग बॉसमध्ये दिसली. या शोमुळे तिला भारतात तुफान प्रसिद्धी मिळाली.

वीणा मलिक अशी आली लाइमलाइटमध्ये-

पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद आसिफची वीणा मलिक ही एक्स- गर्लफ्रेंड होती.

त्याची गर्लफ्रेंड असताना तिने भारत- पाकिस्तान सामन्यात मॅच फिक्सिंग झाल्याचं खळबळजनक वक्तव्य केलं होतं.

आसिफ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे असाही आरोप तिने यावेळी केला होता. 2010 पर्यंत पाकिस्तान एकही सीरिज जिंकणार नाही असं आसिफ तिला म्हणाला असल्याचा खुलासा विणाने केला होता.

याशिवाय आयपीएलमध्ये डोपिंग टेस्ट दरम्यान, आसिफने एका भारतीय डॉक्टरला लाचही दिली होती. तिच्यामते, पातिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा आधीपासूनच फिक्स होता.

यानंतर तिला बिग बॉसच्या चौथ्या सीझनमध्ये बोलवण्यात आलं. यात तिची आणि अश्मित पटेलची जवळीक सर्वात जास्त गाजली.

तिला या शोमुळे एवढी प्रसिद्धी मिळाली की आजही वीणा मलिकचं नाव घेतलं की बिग बॉसची वादग्रस्त स्पर्धक असाच विचार सर्वात आधी येतो.

लहान मुलाला सोडून लंच डेटला गेली 'ही' बॉलिवूड जोडी

लोक म्हणायचे काही दिवसही टिकणार नाही अजय- काजोलचं लग्न, आज आहे ‘हिट कपल'

एक्स वहिनी, भाऊ, एक्स गर्लफ्रेंड, गर्लफ्रेंडची बहीण; कोणाकोणाची मदत करणार सलमान

VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 11:43 AM IST

ताज्या बातम्या