करून दाखवलं! 27 वर्षांपूर्वीच मोदींनी 370 हटवण्याचा केला होता पण

करून दाखवलं! 27 वर्षांपूर्वीच मोदींनी 370 हटवण्याचा केला होता पण

26 जानेवारीला लाल चौकवर भाजप समर्थकांनी भारताचा झेंडा फडकावला होता. नरेंद्र मोदी तेव्हा फक्त एक कार्यकर्ते होते.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट- जम्मू- काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्यात आला असून कलम 370 पूर्णपणे लागू करण्याऐवजी त्याचं उपकलम 370 ए फक्त लागू होणार. यानुसार जम्मू- काश्मीरला दिला जाणारा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. याशिवाय राज्याच्या लडाख भागालाही वेगळं करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. लडाखही केंद्रशासित राज्य असेल. हे संपूर्ण प्रकरण फक्त देशातच नाही तर जगभरात चर्चेचा विषय झालं आहे. एकीकडे सरकारच्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे तर दुसरीकडे जम्मू- काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी याला काळा दिवस म्हंटल आहे. दरम्यान, अभिनेते आणि भाजप नेते परेश रावल यांनी सर्वांना बुचकळ्यात टाकणारा फोटो शेअर केला.

रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जुना फोटो शएअर करत म्हटलं की, ‘तुम्हाला अनेक सलाम’ या फोटोत तरुणपणातील मोदी दिसत आहेत. त्यांच्या मागे एक बॅनरही दिसत आहे. या बॅनरवर कलम 370 हटवा, दहशकवाद मिटवा, देश वाचवा... चला काश्मीर असा संदेश लिहिलेला दिसत आहे. परेश यांनी जो फोटो शेअर केला त्यात ठळक कलम 370 शब्दाला रेखांकित केलं आहे. परेश रावल यांच्या मते, मोदी यांनी अनेक वर्षांपूर्वी कलम 370 हटवण्याचा पण केला होता.

1992 च्या एकता यात्रेचा आहे हा फोटो-

विशेष म्हणजे 1992 मध्ये भारतीय जनता पार्टीने लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली एकता यात्रा काढली होती. यावेळी भाजपचे अनेक समर्थक काश्मीरमध्ये गेले होते. तेव्हा 26 जानेवारीला लाल चौकवर भाजप समर्थकांनी भारताचा झेंडा फडकावला होता. नरेंद्र मोदी तेव्हा फक्त एक कार्यकर्ते होते. मोदी पहिल्यांदा 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले. हा फोटो त्याही आधीचा सुमारे नऊ वर्ष जूना आहे.

कलम 370 वर परेश रावल यांनी साधला महबूबा मुफ्ती यांच्यावर निशाणा

परेश रावल यांनी अजून एक ट्वीट करत कलम 370 संदर्भात सरकार आणि देशाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, ‘आता कोणी आजारी नाही पडणार.’ तसेच मुफ्ती यांच्या ट्वीटला रीट्वीट करत म्हटलं की, त्यांच्या डोक्यावर ओढणी आणि मेंदूवर पडदा पडला आहे.

Article 370 : जायरा वसीमने केलं ट्वीट, 'ये वक्त भी गुजर जाएगा'

पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्वीट, सुरू झालं ट्विटर वॉर

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा’ या 11 डायलॉगने काढली पाकची इज्जत

मृत्यूच्या दाढेत 'तो' जीव मुठीत घेऊन उभा, पाहा हा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या