Article 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर परेश रावल बोलले, 'आज खरा स्वातंत्र्य दिवस'

आपल्यासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. आज खऱ्या अर्थाने भारत एक झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 04:13 PM IST

Article 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर परेश रावल बोलले, 'आज खरा स्वातंत्र्य दिवस'

मुंबई, ०५ ऑगस्ट- गृहमंत्री अमित शहा यांनी आज राज्यसभेत जम्मू- काश्मीरमधून कलम 370 अंतर्गत विशेष अधिकार हटवण्याचा प्रस्ताव मांडला. याशिवाय जम्मू- काश्मीर आणि लडाखला वेगळं राज्य करण्याचाही प्रस्ताव शहा यांनी मांडला. गृहमंत्र्यांच्या घोषणेनंतर राज्यसभेत विरोधी पक्षांनी या प्रस्तावाचा कडाडून विरोध केला. मात्र सोशल मीडियावर सरकारच्या या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे.

जनतेने सरकारने जम्मू- काश्मीरच्या प्रश्नावर घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करत आपला प्रतिक्रियाही मांडली आहे. भाजपचे माजी खासदार आणि अभिनेता परेश रावल यांनी केंद्र सरकारच्या जम्मू काश्मीर पुनर्रचनेच्या प्रस्तावाचं स्वागत केलं. परेश यांनी ट्विटरवर लिहिलं की, ‘तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात. जय हिंद’

Loading...

परेश यांनी एका युझरच्या ट्वीटला रीट्वीट करत आपलं मत दिलं. युझरने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘देशाला स्वातंत्र्य मिळताना पाहण्याची संधी मला मिळाली नाही. कश्मीरला कलम 370 आणि 35अ पासून मुक्ती मिळाली हे पाहणं माझ्यासाठी खास होतं. भारत माता की जय.’ या ट्वीटला परेश यांनी रीट्वीट केलं. अजून एका ट्वीटमध्ये रावल यांनी आज खरा स्वातंत्र्य दिवस असल्याचं म्हटलं.

निर्णयानंतर परेश यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, ‘आपल्यासाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आहे. आज खऱ्या अर्थाने भारत एक झाला आहे.’ अभिनेता कुणाल कोहलीने ट्वीट करत म्हटलं की, ‘डोळ्यांसमोर इतिहास बदलत आहे.’ गुल पनागनेही या प्रकरणावर आपलं मत व्यक्त करत म्हटलं की, ‘370 गेलं. हे फार मोठं पाऊल होतं. पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा. आशा आहे की उज्ज्वल भविष्यासाठी सर्वसामान्य काश्मिरींचं आयुष्य बदलेल.’

Article 370 : जायरा वसीमने केलं ट्वीट, 'ये वक्त भी गुजर जाएगा'

पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं भारतीय सेनेवर आक्षेपार्ह ट्वीट, सुरू झालं ट्विटर वॉर

‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा’ या 11 डायलॉगने काढली पाकची इज्जत

VIDEO: नेते नजरकैदेत, कलम 144 लागू; काय आहे जम्मूची आताची स्थिती?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...