• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'संस्कार विसरलीस का?' जाळीदार ड्रेस घालून गणपती आरती करणारी kashmera shah झाली ट्रोल

'संस्कार विसरलीस का?' जाळीदार ड्रेस घालून गणपती आरती करणारी kashmera shah झाली ट्रोल

बोल्ड अभिनेत्री असली तरी कश्मिरानं किमान श्री गणेश पुजेवेळी तरी असा हॉट ड्रेस परिधान करायला नको होता. तिला कसे कपडे घालावेत एवढाही सेन्स नाही, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

  • Share this:
 मुंबई, 18 सप्टेंबर-  सध्या गणेशोत्सव (Ganesh Utsav) पारंपारिक उत्साहात साजरा केला जात आहे. दहा दिवसांसाठी घरोघरी श्री गणरायाचं आगमन झालेलं आहे. कोरोनामुळं यंदा सार्वजनिक गणेशोत्सवावर निर्बंध असले तरी घरोघरी असणारा गणेशोत्सव मात्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक कलाकारांच्या घरी देखील श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. अनेक कलाकार सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या घरातील श्री गणेश आरती, पूजेचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. या फोटो आणि व्हिडिओंना त्यांच्या चाहत्यांकडून पसंती देखील मिळत आहे. याच दरम्यान अभिनेत्री कश्मिरा शाह (Actress Kashmera Shah) जोरदार चर्चेत आली आहे. कश्मिराला सध्या जोरदार ट्रोलिंगचा (Trolling) सामना करावा लागत आहे. अर्थात त्याला कारण देखील तसंच आहे.
View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

कश्मिरा शाह ही बॉलिवूडमधील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सध्या सातत्यानं जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती एअरपोर्टवर विनामेकअप दिसली होती. त्यानंतर लोकांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली. त्यानंतर अभिनेता गोविंदा आणि त्याच्या कुटुंबियांविषयी कश्मिरानं वादग्रस्त विधान करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. परंतु, आता ती एका वेगळ्याच कारणामुळं ट्रोल झाली आहे. कश्मिराच्या घरी देखील श्री गणरायाचं आगमन झालं आहे. मात्र श्री गणेश पूजेवेळी कश्मिरानं स्टायलिश ड्रेस (Stylish Dress) परिधान केला होता. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत कश्मिरानं श्री गणेश पुजेवेळी जाळीदार कुर्ता म्हणजे पारदर्शक परिधान केल्याचं दिसत आहे. त्यामुळं चाहत्यांनी तिच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र श्री गणेश पूजेवेळी कश्मिरासोबत तिचे कुटुंबीय आणि मित्रमंडळी उपस्थित होती. त्यामुळं तिनं स्वतःला कम्फर्टेबल वाटेल असा ड्रेस परिधान केल्याचं बोललं जात आहे. (हे वाचा:Sidharth Shukla Duplicate: हुबेहूब सिद्धार्थ शुक्लासारखा दिसणारा तरुण होतोय ....) बोल्ड अभिनेत्री असली तरी कश्मिरानं किमान श्री गणेश पुजेवेळी तरी असा हॉट ड्रेस परिधान करायला नको होता. तिला कसे कपडे घालावेत एवढाही सेन्स नाही, असं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे श्री गणेश पुजेवेळी तरी योग्य कपडे परिधान करायला हवे होते, अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून दिली आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठीच कश्मिरानं असा कुर्ता परिधान केल्याचा आरोपही काही चाहत्यांनी केला आहे. कश्मिरा शाहच्या या कृतीनं तिला सध्या जोरदार टिकेचा सामना करावा लागत असून, चाहतेदेखील तिचा ड्रेस पाहून नाराजी व्यक्त करताना दिसत आहे.
First published: